kia कंपनीने आपल्या Seltos Facelift चे अनावरण केले आहे. नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ADAS फीचर मिळणार आहे. २०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्टचे बुकिंग १४ जुलैपासून सुरू झाले आहे. या SUV मध्ये तुम्हाला ADAS लेव्हल २ तंत्रज्ञान मिळते ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि बरेच काही समाविष्ट आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किआ सेलटॉस फेसलिफ्टमध्ये AT, DCT, IVT, iMT आणि MT सारखे ट्रान्समिशन पर्याय मिळतात. २०२३ किआ सेलटॉस फेसलिफ्टमध्ये ६ एअरबॅग्स मिळणार आहेत. या नवीन सेल्टोस फेसलिफ्टमध्ये ३२ सुरक्षा वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ही कार ३ पॉवरट्रेन आणि ५ ट्रान्समिशनसह लॉन्च करण्यात आली आहे. 2023 Kia Seltos फेसलिफ्टला नवीन १.५-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे जास्तीत जास्त १६० PS पॉवर आणि २५३ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन सेल्टोसला सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली एसयूव्ही बनवते.

(हे ही वाचा : Creta चा खेळ खल्लास करण्यासाठी नव्या अवतारात येताहेत दोन SUV, पहिल्या कारला २१ हजारात करा बुक

नवीन Seltos मधील सर्वात मोठे अपग्रेड म्हणजे, ADAS (Advanced Driver Assistance System) हे आहे. तसेच यामध्ये पॅनोरॉमिक सनरूफ देण्यात आलं आहे. यात नवीन हेडलॅम्प डिझाइन आणि नवीन DRLs मिळणार आहेत.

किंमत

किआ सेलटॉस फेसलिफ्ट Hyundai Creta तसेच Grand Vitara, Skoda Kushaq, MG Aster आणि Toyota Urban Cruiser Hyrider यांच्याशी स्पर्धा करेल. Kia Seltos फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत १०.९० लाख ते २० लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2023 kia seltos facelift unveiled with adas features officially start bookings for the seltos 2023 from july 14 pdb