सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच आता असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात हा तीन वर्षाचा चिमुकला चक्क कार चालवितांना दिसतोय. कार चालवणे हे एक उत्तम कौशल्य आहे. बहुतेक लोक १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर कार चालवतात. अशा स्थितीत अशी घटना समोर आली आहे, जी खरोखरच आश्चर्यकारक आहे. यात हा तीन वर्षांचा मुलगा 769-एचपी स्पोर्ट्स कार चालवितांना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Ferrari SF90 Stradale sports कार

ही कार फेरारी SF90 Stradale आहे. या मुलाने ड्रायव्हरच्या सीटवर बसून गाडी चालवली आहे. भारतात या कारची किंमत ७.५० कोटी रुपये आहे. हा मुलगा व्हिडिओमध्ये फेरारी SF90 Stradale चालवत आहे, Jan Sofuoglu हा ३ वर्षांचा मुलगा आहे. पॉवर-पॅक स्पोर्ट्स कार चालवण्याव्यतिरिक्त, झैन गियरलेस दुचाकी, एटीव्ही, स्टीमर आणि बरेच काही चालवू शकते. हा प्रतिभावान मुलगा केनन सोफुओग्लूचा मुलगा आहे, जो मोटरसायकल सुपर स्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपचा पाच वेळा विजेता आहे.

(हे ही वाचा: दिसायला खूपच आकर्षक असणाऱ्या ‘Audi Q3 Sportback’ एसयूव्हीचं बुकिंग सुरु, ‘इतक्या’ रुपयात करा बुकिंग )

पाहा Viral Video

फेरारी स्पोर्ट्स कार चालवतानाचा त्याचा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, हा मुलगा कारच्या एक्सलेटर आणि ब्रेक पेडलवर पाय ठेवण्याचा खूप प्रयत्न करत आहे. मुलगा कारच्या डॅशबोर्डच्या वर काहीही पाहू शकत नाही आणि तो कुठे गाडी चालवत आहे हे पाहण्यासाठी कारच्या छतावरील कॅमेऱ्यातून फीड दर्शविणारा तो मॉनिटर वापरतो.

Ferrari SF90 Stradale sports कार ‘अशी’ आहे खास

ही फेरारी SF90 Stradale आहे, जी स्कुडेरिया फेरारीच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त लक्झरी स्पोर्ट्स कार निर्मात्याने बनवली आहे. फेरारी SF90 Stradale मध्ये १२० kW इलेक्ट्रिक मोटरसह ७६९ hp निर्मितीसाठी ट्यून केलेले V8 इंजिन आहे. हे सर्व कारच्या एरोडायनॅमिकली डिझाइन केलेल्या बॉडीसह २.५ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम करते. कारचा टॉप स्पीड ३३९ किमी प्रतितास आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A three year old boy not only perfectly maneuvered but also parked a 769 hp sports car rs 7 50 crore in india pdb
First published on: 07-02-2023 at 13:57 IST