Premium

मारुतीची ‘ही’ लोकप्रिय कार येणार नव्या रूपात! पाहा कोणते होणार महत्त्वपूर्ण बदल….

मारुती सुझुकी स्विफ्टची नवी गाडी ही २०२४ मध्ये एक नव्या रूपात येणार असून, त्यामध्ये कोणते बदल आहेत ते पाहा.

Maruti Suzuki swift car design revealed
मारुती सुझुकीच्या नव्या गाडीची झलक .[photo credit -@piloton_wheels]

टोकिओ मोबिलिटी शोमध्ये, सुझुकीने नुकतीच स्विफ्ट ही संकल्पना दाखवली आहे. सोशल मीडियावरील एका व्हिडीओमार्फत या नव्या स्विफ्ट गाडीचे मागच्या बाजूने आगळेवेगळे रूप पाहायला मिळाले आहे. नवीन येणारी ‘मारुती सुझुकी स्विफ्ट’ आपल्यासोबत कोणकोणत्या खास गोष्टी घेऊन येणार आहे हे पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२४ मध्ये येणाऱ्या मारुती सुझुकीचे डिझाईन

स्विफ्ट ही गाडी आपल्या मूळ संकल्पनेला सोबत घेऊन पुढे जाणार असली तरीही तिचे डिझाईन काहीसे भक्कम आणि जड क्लॅडिंगचे [cladding] असणार आहे. पुढे बसवण्यात येणारी लोखंडी जाळी [grille] ही दिसायला मधमाशीच्या पोळ्याच्या आकाराची [honeycomb] असेल. दोन्ही हेडलाईट्स आणि DRLs हे सध्याच्या मॉडेल्सपेक्षा अधिक तीव्र प्रकाशाचे असणार आहेत. स्विफ्ट गाडी बाजूने बऱ्यापैकी आहे तशीच राहणार असून, त्याचे रेअर डोअर हँडल्स हे आधीसारख्या पद्धतीनुसार असतील. रेअरसह टेलगेट आणि लाईट क्लस्टरदेखील काहीसे आतल्या बाजूला वळवून घेण्यात आले आहे. मात्र, बम्पर काहीसा बोजड वाटत असला तरीही ते खात्रीशीर सांगता येणार नाही. कारण- व्हिडीओमधील ही टेस्ट गाडी पूर्णतः केमोफ्लाज केलेली आहे.

२०२४ मारुती सुझुकीचे परिमाण [Dimensions]

२०२४ मारुती सुझुकी स्विफ्ट ही ३,८६० एमएम लांब, १,६९५ एमएम रुंद व १,५०० एमएम उंच आहे. म्हणजेच ही आतापेक्षा १५ एमएम जास्त लांबीची, ४० एमएम बारीक व ३० एमएमने कमी उंचीची आहे. २,५४० एमएममध्ये व्हीलबेसची लांबी सारखीच आहे. मात्र, ही सर्व आंतरराष्ट्रीय परिमाणे असून, भारतात आल्यानंतर या गाड्यांच्या परिमाणांमध्ये फरक असू शकतो.

हेही वाचा : BMW ने भारतात ‘ही’ गाडी केली लॉन्च! काय आहेत या भन्नाट गाडीचे फीचर्स आणि किंमत पाहा….

२०२४ मारुती सुझुकीचे इंजिन

टोकियो मोबिलिटी शोमध्ये मारुती सुझुकीने आपल्या नवीन इंजिनाबद्दल काही माहिती दिली आहे. १.२ लिटरचे तीन सिलिंडर नॅचरली अॅस्प्रिन्टेड इंजिन असून, त्याने सध्याच्या १.२ लिटर चार सिलिंडर इंजिनाची जागा घेतली आहे; ज्याचे आउटपुट ८९ बीएचपी व ११३ एनएम इतके आहे. स्विफ्टने याखेरीज आपल्या इंजिनाबद्दल अजून काही माहिती दिलेली नसली तरीही त्यामध्ये आता आहे त्यासारखी पॉवर आणि अधिक इंधन कार्यक्षमता असेल, अशी अपेक्षा आहे. या शोमध्ये एका जपानी निर्मात्यानेही त्यांचे १.२ लिटर इंजिन आणि नवे सीव्हीटी ट्रान्स्मिशन हायब्रीड व्हर्जन दाखवले.

आता हे हायब्रीड टेक भारतातदेखील उपलब्ध होईल का हे मात्र पाहावे लागेल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maruti suzuki swift spotted testing on road car design revealed know more about features dha

First published on: 30-11-2023 at 19:57 IST
Next Story
५.९९ लाखाच्या ६ एअरबॅग्सवाल्या सर्वात लहान SUV ची देशभरात छप्परफाड विक्री; वेटिंग पीरियड पोहोचला ‘इतक्या’ महिन्यांवर