इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी पाहता, इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या कंपन्यांचे लक्ष इलेक्ट्रिक बाइक्सवर (Electric Bike) आहे. हेच कारण आहे की, सध्या देशात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक बाईक आहेत, ज्या किमती आणि रेंजच्या दृष्टीने पेट्रोल बाईकच्या जवळपासच आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक विकत घेण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. कारण, बंगळुरुस्थित इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीने भारतीय बाजारपेठेत आता तुमच्यासाठी खास ‘oben rorr’ (ओबेन रोर ) इलेक्ट्रिक बाईक आणलीआहे. ही बाइक तिच्या रेंज आणि फीचर्समुळे लोकप्रिय आहे. चला तर मग या दमदार इलेक्ट्रिक बाइकची काय आहे खासियत जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Oben Rorr ‘अशी’ आहे खास

या बाइकमधली बॅटरी नॉर्मल चार्जरने चार्ज करण्यात २ तास लागतात. सोबत कंपनी फास्ट चार्जिंग ऑप्शन देखील देते. कंपनीने यातल्या बॅटरीवर ३ वर्षांची वॉरंटी दिली आहे. यातली बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बाइक २०० किमीपर्यंतची रेंज देते. ही रेंज आयडीसी प्रमाणित आहे. या बाइकचा टॉप स्पीड १०० किमी प्रति तास इतका आहे. यातली बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी १५ ते २५ रुपये इतका खर्चं येईल. या बाइकमध्ये कंपनीने 4.4 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. यासह 1000W पॉवर आउटपुट वाली इलेक्ट्रिक मोटर यात मिळते.

(आणखी वाचा : Bike Helmet: दुचाकीधारकांसाठी खुशखबर! तुमचं हेल्मेटच वाचवणार तुमचं प्राण; आलयं ‘हे’ नवं तंत्रज्ञान )

Oben Rorr किंमत किती?

ओबेन रोर इलेक्ट्रिक बाइकची सुरुवातीची किंमत १ लाख ०२ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या बाइकची ऑन रोड प्राईस १ लाख ०७ हजार १३६ रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oben rorr electric bike runs 200 km on a single charge pdb
First published on: 08-12-2022 at 20:07 IST