scorecardresearch

Bike Helmet: दुचाकीधारकांसाठी खुशखबर! तुमचं हेल्मेटच वाचवणार तुमचं प्राण; आलयं ‘हे’ नवं तंत्रज्ञान

हेल्मेटसाठी आलयं नव तंत्रज्ञान. वाचवणार तुमचं प्राण

Bike Helmet: दुचाकीधारकांसाठी खुशखबर! तुमचं हेल्मेटच वाचवणार तुमचं प्राण; आलयं ‘हे’ नवं तंत्रज्ञान
आता हेल्मेट अधिक सुरक्षित होणार. आहे.(Photo-financialexpress)

दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातांना बळी पडतात. सरकारही वाढणाऱ्या अपघातांबाबत गंभीर असून, सातत्याने यात सुधारणा केल्या जात आहेत. वाढत्या मृत्युंची संख्या लक्षात घेऊन आता दुचाकी प्रवासात स्वतःचं संरक्षण करण्यासाठी वाहनांमध्ये एअरबॅग असतात. मात्र, आता दुचाकीधारकांनाही या एअरबॅग्जचा फायदा मिळणार आहे. कारण, इटालियन कंपनी एरोह अशा हेल्मेटसाठी तंत्रज्ञान तयार करत असून त्यांनी हेल्मेटमध्ये एअरबॅग्ज बसवल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे आता दुचाकी चालवणे अधिक सुरक्षित होईल.

काय खास असेल हेल्मेटमध्ये?

आता यामुळे दुचाकीधारकांना मोठा फायदा होणार आहे. या हेल्मेटमुळे डोक्याला दुखापत होण्याची शक्यता कमी होणार आहे. एरोहने ‘एअरहेड’ नावाचे नवीन हेल्मेट सादर केले आहे, ज्याचे वैशिष्ट्य म्हणजे, या हेल्मेटमध्ये अशा एअरबॅग्ज असतील ज्या गरजेच्या वेळी उघडतील आणि रायडरच्या डोक्याला खोल दुखापत होण्याची शक्यता कमी करेल.

(आणखी वाचा : Electric Scooter Offer: सुवर्णसंधी! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय तगडा डिस्काउंट; जाणून घ्या किती होणार तुमची बचत! )

हेल्मेटचा बाहेरचा भाग अशा प्रकारे डिझाइन केलेला आहे की, उघडल्यानंतरही डोके हलवायला भरपूर जागा असते आणि रायडरला जास्त दबाव जाणवत नाही. म्हणजेच अपघातानंतर तुमच्या डोक्याला किंवा चेहऱ्याला दुखापत होण्याची शक्यता नगण्य असेल.

कधी होणार लाँच?

तथापि, या हेल्मेटच्या वैशिष्ट्यांशी संबंधित जास्त माहिती किंवा लॉन्चिंग आणि किंमतीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. तथापि, काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ते पुढील वर्षी लाँच केले जाऊ शकते.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 16:51 IST

संबंधित बातम्या