Royal Enfield Classic 350 : रॉयल एनफील्ड कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत येत असते.रॉयल एनफील्डचा एक मोठा चाहतावर्ग दिसून येतो. लूक आणि फीचर्समुळे अनेक जण आवडीने ही दुचाकी खरेदी करतात. रॉयल एनफिल्ड अनेकदा तिचे अपडेटेड व्हर्जन बाजारात आणते. आता १२ ऑगस्टला रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० चे अपडेटेड व्हर्जन लाँच करणार आहे. क्लासिक ३५० रॉयल एनफील्ड ही सर्वात जास्त विक्री होणारी दुचाकी आहे. ज्याची सरासरी विक्री दर महिन्याला २०,००० युनिट आहेत. कंपनी या दुचाकीला डिझाइनपासून फीचर्सपर्यंत नवनवीन अपडेट्ससह मार्केटमध्ये लाँच करणार आहे. रॉयल एनफील्डनी २०२१ मध्ये नवीन जनरेशनची क्लासिक ३५० लाँच केली होती ज्यामध्ये नवीन चेसिस आणि नवीन इंजिन सुद्धा आहे. ही दुचाकी अपडेट केल्यानंतर सुद्धा जुन्या क्लासिक ३५० चे हे फिचर्स या नवीन दुचाकीमध्ये सुद्धा दिसून येईल. हेही वाचा : Fastag New Rules: १ ऑगस्टपासून फास्टॅगचे नियम बदलणार; वाहन काढण्यापूर्वी ‘या’ गोष्टी तपासा नाहीतर भरावा लागेल दुप्पट टोल या अपडेटेड दुचाकी रॉयल एनफील्ड ३५० मध्ये नवीन LED हेडलॅम्प, LED टेल लॅम्प आणि LED पायलट लॅम्प सुद्धा असणार. ज्यामुळे ही दुचाकी आणखी आकर्षक दिसेल. या क्लासिक ३५० मध्ये अनेक उपकरण वापरले आहेत जे ग्राहकांच्या पसंतीस उतरू शकतात. रिअर ड्रम ब्रेक सुद्धा असणार जो क्लासिक ३५० खरेदी करण्यास अनेकांना प्रेरित करतो. रॉयल एनफील्ड ३५० चे फीचर्स इंजिन एका मजबूत ड्युअल-क्रॅडल फ्रेममध्ये ठेवलेले आहे, ज्याला पुढील बाजूस ४१ मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस प्रीलोड-ॲडजस्टेबल ट्विन शॉक अॅब्जॉर्बरने धरुन ठेवले आहे ज्यामुळे आरामदायी प्रवास आपण करू शकतो. क्लासिक ३५० मध्ये ३४९ सीसी चा दमदार एअर ऑइल कूल्ड सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जो २०.२ बीएचपीचा पावर देतो आणि २७ एनएमचा पीक टॉर्क देतो. ही मजबूत मोटार एका स्मूथ शिफ्टिंग ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेली आहे जी चांगला वेग प्रदान करतो. ब्रेकिंग ही दोन्ही चाकांवर सिंगल डिस्कद्वारे नियंत्रित केली जाते, ज्यामध्ये मागील बाजूस बेस ट्रिममध्ये ड्रम ब्रेक असतो. ड्युअल-डिस्क मॉडेलमध्ये ड्युअल-चॅनल एबीएस(ABS) असतो, तर सिंगल-डिस्कमध्ये सिंगल-चॅनेल एबीएस (ABS) असतो. याशिवाय कॉम्पॅक्ट डिजिटल डिस्प्ले, USB चार्जिंग पोर्ट आणि ॲनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी फीचर्सचा समावेश आहे.