Second Hand Car Maintenance Tips In Marathi : चार चाकी असो किंवा दुचाकी हक्काची एखादी तरी गाडी असावी, असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, नवीन गाडी बजेटमध्ये बसत नसल्याने काही जण सेकंड हॅण्ड गाडीचा पर्याय स्वीकारतात. मात्र, सेकंड हॅण्ड गाडी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते अगदी त्याचप्रमाणे गाडी खरेदी केल्यानंतरही वर्षानुवर्षे गाडीचे नुकसान होणार नाही यासाठी काही गोष्टी जाणून घेणेसुद्धा महत्त्वाचे असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचबरोबर बदलत्या काळात आता खरेदीदार त्यांच्या निवडीबद्दलसुद्धा जागरूक होत आहेत. नवीन वाहनांसाठी अधिक स्मार्ट, अधिक स्वस्त पर्यायांना प्राधान्य देत असल्याने भारतातील वापरलेल्या कारच्या बाजारपेठेत वाढ होत आहे. तर, सेकंड हॅण्ड वाहन वापरणाऱ्या मालकांनी गाडीची सुरक्षितता आणि गाडीचे दीर्घ आयुष्य सुनिश्चित करण्यासाठी वाहनाची नियमित देखभाल करणे अत्यावश्यक आहे.

सेकंड हॅण्ड वाहनासाठी टिप्स खालीलप्रमाणे…

१. सर्व्हिस हिस्ट्री इन्स्पेक्शन (Service History Inspection)

कारच्या सर्व्हिस रेकॉर्डस् व ओनरशिप हिस्ट्रीचे पुनरावलोकन करणे, गाडीची स्थिती समजून घेणे या बाबी गाडीसंबंधित आधीच्या कोणत्या समस्या आहेत का हे ओळखण्यास मदत करतात अधिकृत डीलरकडून व्हेरिफाईड रेकॉर्ड प्रदान केले जाऊ शकतात. उदाहरणार्थ- योग्य देखभाल ही बाब वाहनाच्या मेंटेनन्समध्ये कोणतेही अंतर नाही ना याबद्दलचा विश्वास प्रदान करतो.

२. इंजिन आणि ट्रान्स्मिशन केअर

इंजिनाला वाहनाचे हृदय, असे संबोधले जाते. कारण- इंजिन गाडीच्या हालचालींना सामर्थ्य देते. त्यामुळे इंजिन सुरळीत चालते आहे ना हे सुनिश्चित करण्यासाठी नियमित फिटनेस तपासणी करणे आवश्यक आहे. चांगल्या कार्यक्षमतेसाठी इंजिनामध्ये योग्य वायुप्रवाह सुनिश्चित करण्यासाठी दर १५ ते ३९ किमी (15k to 30k) मैलांवर एअर फिल्टर बदला. गाडीचा टायमिंग बेल्ट किंवा चेन बदलण्यासाठी मॅन्युफॅक्चरर मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा आणि नियमितपणे इंजिन ऑईल बदला.

३. बॅटरी तपासणे

सेकंड हॅण्ड कार खरेदी करण्याआधी बॅटरीची स्टोअर करण्याची क्षमता गमावण्यापूर्वी, बॅटरीचे वय तपासून, ती वेळेत बदलली गेली आहे ना हे पाहणे महत्त्वाचे आहे. तसेच, गंज, नुकसान किंवा गळती यांसारखे घटक लक्षात घेणे आवश्यक आहे; जे भारतीय रस्त्यांवर सुरळीत प्रवास करताना अडथळा आणू शकतात

४. सस्पेन्शन आणि अलायमेन्ट (alignment)

सस्पेन्शन हा वाहनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो त्याला स्थिर ठेवतो; ज्यामुळे तुम्ही प्रवासात खडबडीत रस्त्यांवरूनही व्यवस्थित पुढे मार्गक्रमण करू शकता. रेग्युलर सस्पेन्शनच्या देखभालीमध्ये व्हिज्युअल इन्स्पेक्शन, सस्पेन्शन नॉईज, राइड कम्फर्ट आणि टायर वेअर या बाबींचा समावेश असतो. भारतातील विविध रस्त्यांच्या पृष्ठभागावर गाडी सुरक्षितपणे चालविण्यासाठी योग्य अलायमेन्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.

५. ब्रेक हेल्थ

स्पॉन्जी किंवा सॉफ्ट ब्रेक पेडल्स यांसारख्या चिन्हांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण- ब्रेकिंग पॉवर कमी होणे आणि ब्रेक फेल्युअर होऊ नयेत म्हणून आवश्यक तेव्हा ब्रेक सिस्टीमची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे. म्हणूनच सुरक्षेसाठी नियमित ब्रेक मेंटेनन्स महत्त्वाचा आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second hand car maintenance tips here are some valuable tips to make your vehicle run for years to come asp