निसर्गात वेगवेगळ्या रंगांची तसेच वेगवेगळा आकार आणि सुवास असणारी फुले आढळतात. काहींचा आकार आणि रंग आपले लक्ष वेधून घेतो. असेच एक सुंदर, नाजूक फूल म्हणजे गोकर्ण. गोकर्ण ही भारतीय वंशाची वेलवर्गीय सदाहरित वनस्पती. Clitoria ternatea (क्लायटोरिया टरनेशिया) हे गोकर्णाचे शास्त्रीय नाव. फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो म्हणून याला ‘गोकर्ण’ हे नाव पडले असावे. गोकर्णाच्या फुलांचा रंग गडद निळा असतो. तसेच फिकट निळा, फिकट गुलाबी, सफेद या रंगांची फुले असलेली गोकर्णदेखील आढळते. रंग कोणताही असो; गर्द हिरव्या पानांत ही फुले अगदी उठून दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोकर्णाच्या फुलांचा आकार गायीच्या कानासारखा असतो. पाच पाकळ्यांनी बनलेल्या या फुलात एक पाकळी मोठी असते. तिचाच आकार गायीच्या कानासारखा असतो. गोकर्णाच्या वेलीला पावसाळ्यात फुले येतात. फुले काय- अक्षरश: बहर येतो. ही फुले सुकून गेली की शेंगा येतात. शेंगा साधारण फरसबीच्या शेंगेच्या आकाराच्या; परंतु चपटय़ा असतात. कोवळ्या शेंगांची भाजी केली जाते.

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about clitoria ternatea flower
First published on: 30-07-2017 at 02:11 IST