|| रूपाली ठोंबरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही गोष्ट आहे निळ्याभोर आकाशात राहणाऱ्या एका गोड परीराणीची. परीराणी… खूप सुंदर आणि हुशार. सर्वांना खूप जीव लावणारी. निळ्या आभाळात सोनेरी उन्हानंतर रोज सायंकाळी मावळत्या सूर्यराजाच्या लालसर प्रकाशाने खुललेल्या त्या अबोली मेघपुंजक्यांमध्ये लपाछपी खेळायला तिला फार आवडत असे. तिच्या  स्वर्गातल्या महालात ऐश्वर्य आणि सर्व सुखसोयी होत्या. त्यामुळे खरं तर ती आनंदी असायला हवी. पण तरी ती मनातून थोडीशी दु:खी असायची. कारण बऱ्याचदा ती एकटीच असायची. इतके सारे छान असूनही काहीतरी होते- जे तिच्या मनासारखे नव्हते. हवेहवेसे, पण तिथे न मिळणारे असे काहीतरी ती शोधत असे. एकदा तिची ही समस्या घेऊन ती देवबाप्पाकडे गेली. म्हणाली, ‘‘इथे माझ्यासाठी छान छान कपडे आहेत. महालासारखे मोठे ढगांचे घर आहे. खायच्या प्यायच्या गोष्टींबद्दल तर विचारायलाच नको. खेळायला खूप काही आहे. पाण्याच्या थेंबांच्या रूपात चमचमणारे हिरे, ताऱ्यांचे शुभ्र मोती, सुवर्णकमळे, इंद्रधनूच्या रंगीत माळा असे खूप खूप दागिने आहेत. आसमंती विहरण्यासाठी चंद्राचा रथसुद्धा आहे. पण का कुणास ठाऊक, मला इथे काहीतरी कमी आहे असे नेहमी वाटते. काय असेल ते, त्याचाही पत्ता लागत नाही. तुला माहीत आहे का असे काय आहे, जे इथे नाही, ज्यामुळे मी इतकी अस्वस्थ आहे? आणि कुठे मिळेल मला ते? त्या एका गोष्टीसाठी मी हे सारे ऐश्वर्य त्यागण्यास तयार आहे. फक्त ती एक अनमोल गोष्ट मला मिळू दे.’’

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Author rupali thombre article desire of the queen akp
First published on: 16-01-2022 at 00:03 IST