आधुनिक जगाचा इतिहास

मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता.

दुसऱ्या जागतिक महायुद्धात (१९३९-१९४५) प्रथमच अण्वस्त्रांचा वापर होतो व मानवी इतिहासातील सर्वात मोठा संहार होतो.

मध्ययुगीन कालखंडात मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर धर्माचा विलक्षण पगडा होता. युरोपमधील प्रबोधनातून जन्म घेणाऱ्या धर्मनिरपेक्ष, तर्काधिष्ठित विचारधारेने धर्माचा प्रभाव मर्यादित केला, धार्मिक सुधारणा घडवून आणल्या व नवमूल्यांवर आधारित नव्या समाजव्यवस्थेची, राज्यव्यवस्थेची नि अर्थव्यवस्थेची निर्मिती केली. सामंतशाही व्यवस्थेचा ऱ्हास, प्रबोधन, वैज्ञानिक व भौगोलिक शोध, राष्ट्र-राज्यांचा उदय या घटकांमुळे मध्ययुगीन कालखंडावर पडदा पडतो व आधुनिक कालखंडाची पहाट होते.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार १८ व्या शतकातील महत्त्वाच्या घटना, जागतिक महायुद्धे, वसाहतीकरण, निर्वसाहतीकरण, साम्यवाद, उदारमतवाद, समाजवाद यांसारख्या विचारप्रणाली यांचा आधुनिक जगाचा इतिहास या घटकात अंतर्भाव होतो. या सर्व घटना व घटक जागतिक, मानवी जीवनरूपी शृंखलेचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक जागतिक इतिहासाचा अभ्यास किंवा आढावा हा एका ताíकक प्रवाहाचा अभ्यास/ आढावा ठरतो.

१८ व्या शतकातील घटनांची पाश्र्वभूमी ठरलेले प्रबोधन, अमेरिकन राज्यक्रांती (१७७६), फ्रेंच राज्यक्रांती (१७८९), नेपोलियनचा उदय व अस्त, औद्योगिक क्रांती या घटकांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. या घटनांमागील कार्यकारणभाव, महत्त्वाचे विचारप्रवाह व या घटनांचा परिणाम नि परस्परसंबंध या अंगांचे आकलन आवश्यक आहे. ‘व्यापारवादाने प्रेरित’ अमेरिकन राज्यक्रांतीवरील प्रश्न या विवेचनाला अधोरेखित करतो. फ्रेंच राज्यक्रांतीला अमेरिकन राज्यक्रांतीची पाश्र्वभूमी, तत्त्वज्ञांचे योगदान, राज्यक्रांतीद्वारे उद्घोषित मूल्ये, तिचे यशापयश व जागतिक प्रवाहावरील परिणाम यांचे आकलन आवश्यक ठरते.

औद्योगिक क्रांती, तिचे मानवी जीवनावरील राजकीय, सामाजिक, आíथक परिणाम, वसाहतवाद, जपानचे औद्योगिकीकरण व आशियाई सत्ता म्हणून उदय, युरोपियन राष्ट्रामध्ये वसाहतीसाठी तीव्र स्पर्धा ही १९ व्या शतकाची महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. वसाहतींसाठीच्या स्पध्रेतून तसेच अनेक प्रादेशिक कारणांतून युरोपियन राष्ट्रांमध्ये आघाडय़ांचे/ युतीचे राजकारण, गुप्त करार, यातून निर्मित परस्पर विश्वासार्हतेचा अभाव यामुळे युरोपमध्ये राजकीय अस्थर्याचे वातावरण तयार झाले. वसाहतींसाठीची स्पर्धा, राजकीय अस्थर्य व राजनयाचे अपयश यांची परिणती पहिल्या जागतिक महायुद्धामध्ये (१९१४-१९१८) होते. या महायुद्धातील संहारामुळे अशी युद्धे भविष्यात टाळण्याची व शांतता टिकवून ठेवण्याची भाषा बोलली जाते. ‘लीग ऑफ नेशन्स’ची निर्मिती व त्याद्वारे शांतता टिकविण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु राष्ट्रीय हितसंबंधांवर कोणतेही राष्ट्र तडजोड करीत नाही. व्हर्सायच्या करारातून जर्मनीवर अपमानास्पद व जाचक अटी लादल्या जातात. १९२९ च्या आíथक महामंदीमुळे जर्मनीची परिस्थिती बिकट होते. जर्मनीचा राष्ट्रवाद व नव्या आशा-आकांक्षाचे स्वप्न यावर आधारित हिटलर व नाझीवादाचा उदय होतो व दुसऱ्या जागतिक महायुद्धाची बीजे पेरली जातात.

दुसऱ्या जागतिक महायुद्धात (१९३९-१९४५) प्रथमच अण्वस्त्रांचा वापर होतो व मानवी इतिहासातील सर्वात मोठा संहार होतो. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, इटली या महासत्तांचा अस्त होतो व अमेरिका, सोवियत युनियन या दोन महासत्तांचा उदय होतो. २०१४ च्या मुख्य परीक्षेत Suez Crisisl वरील प्रश्न ‘इंग्लंडचा जागतिक महासत्ता म्हणून अस्त’ या मुद्दय़ाच्या संदर्भात चच्रेची अपेक्षा ठेवतो. १९४५ पासून १९९० पर्यंतचा काळ ‘शीतयुद्धाचा’ काळ म्हणून ओळखला जातो. या दोन महासत्तांच्या राजकीय विचारप्रणाली भिन्न होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर सोवियत युनियनच्या प्रभावाखालील पूर्व युरोपमध्ये साम्यवादी व्यवस्था तर अमेरिकेच्या प्रभावाखालील पश्चिम युरोपमध्ये भांडवलवादी व्यवस्था प्रस्थापित केली जाते. जर्मनीची दोन भागांत विभागणी होते. पूर्व जर्मनीमध्ये साम्यवाद व पश्चिम जर्मनीमध्ये भांडवलवाद प्रस्थापित केला जातो. या काळात जागतिक राजकारणात प्रचंड तणाव निर्माण झाला, युद्धसदृश परिस्थिती अनेक वेळा निर्माण झाली, पण प्रत्यक्ष युद्धाचा भडका उडाला नाही, म्हणूनच यास ‘शीतयुद्ध’ म्हणतात. बíलनची िभत या शीतयुद्धाचे प्रतीक मानता येईल. शीतयुद्धातील दोन्ही गटांनी (अमेरिकाप्रणीत भांडवलवादी गट व सोवियत युनियनप्रणीत साम्यवादी गट) आपले प्रभाव क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न केले. निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेस महायुद्धांच्या पूर्वीच सुरुवात झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर या प्रक्रियेला वेग प्राप्त झाला व आशिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेत अनेक स्वतंत्र राष्ट्र-राज्यांचा उदय झाला. या राष्ट्र-राज्यांना आपल्या गटात सामील करून घेण्याची स्पर्धा निर्माण झाली. नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांसमोर दारिद्रय़ाचे, बेरोजगारीचे प्रश्न होते, विकासाचे आव्हान होते. अशा परिस्थितीमध्ये शीतयुद्धाच्या स्पध्रेत सामील होणे योग्य नाही, असा विचार असणारे इजिप्तचे नासेर, युगोस्लाव्हियाचे टिटो, इंडोनेशियाचे सुहार्तो व भारताचे नेहरू या नेत्यांनी अलिप्ततावादी धोरणा स्वीकारले. यातून अलिप्ततावादी चळवळ  जन्म घेते. या चळवळीने शीतयुद्धाच्या कोणत्याही गटात सामील न होता शीतयुद्धाचा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

प्रभावक्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नातून महासत्तांवर निर्माण झालेला आíथक ताण, विशेषत: सोवियत युनियनचे आíथक संकट, पूर्व व पश्चिम युरोपमधील विकासातील व स्वातंत्र्यविषयक विरोधाभास, सोवियत युनियनचे प्रमुख मिखाईल गोर्बाचेव्ह यांचा जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीयवादाचा संदेश देणारा नवराजकीय विचार, गोर्बाचेव्ह यांचे सोवियत अंतर्गत उदारमतवादी धोरण, सोवियत युनियनचे विघटन, बíलन भितीचा पाडाव यातून शीतयुद्धाचा अंत होतो व जग एकध्रुवीय होते. शीतयुद्धोत्तर १९९० च्या दशकात अमेरिकेची मक्तेदारी प्रस्थापित होते. तसेच या काळात जागतिकीकरणाचे, उदारीकरणाचे वारे वाहू लागतात. ९/११च्या अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्याने सर्व संदर्भ बदलतात. अमेरिकेचे इराकवरील आक्रमण, अफगाणिस्तानातील हस्तक्षेप, जागतिक मंदी (२००७-२००८), चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका यांचा जागतिक सत्ता म्हणून उदय यामुळे आजचे जग बहुध्रुवीय झाले आहे.

विसाव्या शतकातील वरील मुख्य धाग्याव्यतिरिक्त रशियामधील बोल्शेविक क्रांती, लीग ऑफ नेशन्सचे अपयश, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना व यशापयश, चीनची क्रांती, जपानचा आíथक महासत्ता म्हणून उदय, नवीन आंतरराष्ट्रीय संघटना (नाटो, वर्साव करार, युरोपियन संघ, आसियान, जागतिक बँक, नाणेनिधी संघटना (कटा), जागतिक व्यापार संघटना (हळड) इत्यादींचा अभ्यास आवश्यक ठरतो. याव्यतिरिक्त महत्त्वाचे करार (व्हर्सायचा करार, अटलांटिक चार्टर इ.), महत्त्वाचे सिद्धांत (ट्रमन सिद्धांत – Truman Doctrine) व १८ वे शतक, १८९० ते पहिले महायुद्ध, दोन महायुद्धांमधील काळ, शीतयुद्धाचा काळ, या काळामधील वेगवेगळ्या खंडांतील महत्त्वाच्या घटना यांचा अभ्यास आवश्यक ठरतो. जागतिक इतिहासाच्या प्रवाहातील एक महत्त्वाचा व त्या प्रवाहावर प्रभाव टाकणारा घटक म्हणून राजकीय विचारप्रणालींचा अभ्यास महत्त्वाचा आहे. उदारमतवाद, समाजवाद, साम्यवाद यांसारख्या राजकीय विचारप्रणालींचा आवश्यक अभ्यास व त्यांचा जागतिक इतिहासावरील परिणाम असा अभ्यासाचा रोख असावा. २०१४ च्या मुख्य परीक्षेतील रशियन क्रांतीनंतरच्या सोव्हियत युनियनमधील लेनिनच्या ‘नवआíथक धोरणावरील’ (१९२१) प्रश्न, उत्तरामध्ये या धोरणाचा स्वतंत्र भारताच्या धोरणावरील प्रभाव याच्या मूल्यमापनाची अपेक्षा ठेवतो.

आपल्या इतिहासावरील लेखमालेचा हा शेवटचा लेख. आयोगाच्या परीक्षेतील ‘इतिहास’ या घटकाबाबत व त्यावरील प्रश्नांबाबत अनेक गरसमज आढळतात. मागच्या आठवडय़ात पार पडलेल्या मुख्य परीक्षेतील व यापूर्वी विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर नजर टाकली असता प्रश्नांचे स्वरूप स्पष्ट होते. या प्रश्नांमध्ये बहुशाखीय आकलन व त्यावर तयार केलेले विचार महत्त्वाचे ठरतात. इतर विषयातील संकल्पनांचे आकलन व इतिहास समजावून घेतानाचे त्यांचे उपयोजन अत्यंत आवश्यक ठरते. या लेखमालेमध्ये वारंवार याचा उल्लेख केला गेला. या वर्षीची मुख्य परीक्षा या दृष्टिकोनाला अधोरेखित करते.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त ( Career-vrutantta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The history of modern world

Next Story
मुलाखतीची तयारी ; व्यक्तिगत माहिती आणि आवश्यक कागदपत्रे
फोटो गॅलरी