Success Story Of Himanshu Gaurav Singh : आपल्यातील अनेकांना गणित हा विषय अजिबात आवडत नाही. कारण- इतर विषयांत पाठांतर करणे आणि लक्षात ठेवणे सोपे जात असले तरीही गणित या विषयात आपण तसे करू शकत नाही. त्यामुळे गणिते सोडविण्याचा सराव करणे, त्याची सूत्रे लक्षात ठेवणे आपल्यातील अनेकांना कठीण जाते. पण, आज आपण अशा एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याला लहानपणापासूनच गणित या विषयाचे आकर्षण होते आणि यामुळे त्याने जेईई मेनमध्ये घवघवीत यश मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिमांशु गौरव सिंग लहानपणापासूनच गणित विषयाकडे आकर्षित झाला होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा रहिवासी. त्याने आपल्या गावी एका खासगी संस्थेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्याला गणित सोडवण्यात आनंद मिळत असे. त्याच्या गणिताच्या शिक्षकांनी आकर्षक आणि सोप्या पद्धतींनी त्याची गणिताची आवड जोपासली.

२०१९ मध्ये झालेल्या जेईईच्या मुख्य परीक्षेत हिमांशुने १०० टक्के गुण मिळवले आणि तो आयआयटीमधून शिक्षण घेण्याच्या स्वप्नपूर्तीच्या जवळ पोहोचला. गणित विषयाच्या आवडीमुळे भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT)मधून शिक्षण घेण्याचे त्याचे बालपणीचे स्वप्न पूर्ण झाले.

हिमांशुचा पीएचडीसाठी बर्कलेमध्ये प्रवेश (Himanshu Gaurav Singh enrolled in PhD program in Berkeley)

हिमांशूने स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले. १०० पर्सेंटाइल गुणांसह जेईई मेन्समध्ये १४ वा क्रमांक मिळवला आणि जेईई ॲडव्हान्स्डमध्ये एअर इंडिया रँक २ मिळवला. हिमांशू गौरव सिंगचे वडील सरकारी पॉलिटेक्निक शिक्षक लव कुश सिंग आणि आई गृहिणी रूपा सिंग आहेत. पालकांनी हिमांशूच्या यशात अढळ पाठिंबा देऊन आणि त्याच्या अभ्यासासाठी विचलित न होणारे वातावरण ठेवून महत्त्वाची भूमिका बजावली.

हिमांशूने बर्कले येथे पीएचडी कार्यक्रमात घेतला प्रवेश (Himanshu Gaurav Singh enrolled in PhD program in Berkeley)

हिमांशु सध्या अमेरिकेत एका लोकप्रिय क्षेत्रात शिक्षण घेत आहे, ज्याची सर्व उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. याआधी त्याने इंटर्नशिपद्वारे अनुभव घेतला आहे, ज्यामध्ये २०२१ मध्ये एनके सिक्युरिटीज रिसर्चमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरिंग इंटर्न आणि आयआयटी दिल्लीमधून अभियांत्रिकी पदवी पूर्ण केल्यानंतर टॉवर रिसर्च कॅपिटलमध्ये क्वांटिटेटिव्ह ट्रेडिंग इंटर्न म्हणून काम केले.

एका महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्प्यात हिमांशुने २०२३ मध्ये प्रतिष्ठित कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊन, त्याच्या शैक्षणिक प्रवासाच्या पुढील टप्प्यावर सुरुवात केली. सध्या तो त्याच्या दुसऱ्या वर्षात असून, तो बर्कले एआय रिसर्चमध्ये अत्याधुनिक संशोधनात सक्रियपणे गुंतलेला आहे. तो कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगत विषयांचा सखोल अभ्यास करीत आहे. ही संधी त्याला एआयच्या वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रातील नवीनतम घडामोडींमध्ये योगदान देण्यास आणि त्यांचा शोध घेण्यास अनुमती देते.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story of himanshu gaurav singh who cleared jee advanced with rank 2 asp