X
X

पाकिस्तानची नवी कुरापत, राजकीय नकाशात जुनागड आणि लडाखवर सांगितला दावा

READ IN APP

पाकिस्तानच्या कृतीची भारताने केली कठोर शब्दांत निंदा

पाकिस्तान सरकारने भारताची नवी कुरापत काढली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयाने एक नकाशा पोस्ट केला आहे. पाकिस्तानचा राजकीय नकाशा असे नाव देऊन हा नकाशा पोस्ट करण्यात आला आहे. या नकाशात भारतातील जम्मू काश्मीर, सियाचीन, लडाख आणि गुजरातमधल्या जुनागडवर दावा सांगितला आहे. पाकिस्तानने केलेली ही कृती अत्यंत निंदनीय आणि खोटारडी असल्याचं भारताने म्हटलं आहे. पाकिस्तान सरकारने पोस्ट केलेल्या या नकाशाला काहीही अर्थ नाही. तसंच पाकिस्तानची कृती विचित्र आणि अविचारी आहे असंही भारताने म्हटलं आहे.पाकिस्तानने हे पाऊल पाच ऑगस्टच्या पूर्वी उचलले आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतले कलम ३७० हटवले होते. बुधवारी त्या गोष्टीला पाच वर्षे पूर्ण होणार आहेत. त्याआधीच पाकिस्तानने हे जाणीवपूर्वक ही कुरापत काढली आहे. नव्या नकाशात सियाचीन हा पाकिस्तानचा भाग दाखवण्यात आला असून भारताने या भागावर अवैधरित्या ताबा मिळवल्याची टीका पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केली आहे. तर भारताने पाकिस्तानच्या या कृतीची निंदा केली आहे.

23
X