chineses president xi jinping deposed in coup rumours on social media | Loksatta

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पदच्युत केलं?, सोशल मीडियावरील अफवांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मौन

या अफवा क्षी जिनपिंग यांच्याविरोधात रचल्या गेलेल्या कटाचा भाग असल्याचा दावा काही संकेतस्थळांनी केला आहे

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पदच्युत केलं?, सोशल मीडियावरील अफवांवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे मौन
चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग (फोटो सौजन्य-एपी)

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना पदच्युत केल्याच्या अफवा इंटरनेटवर मुख्यत: सोशल मीडियावर पसरल्या आहेत. क्षी जिनपिंग समरकंदमध्ये शांघाय सहकार्य परिषदेसाठी (SCO) गेले असताना त्यांना कट रचून पदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये पसरले आहे.

यंदाचा चिनी हिवाळा जगाला तापदायक ठरणार…

या घटनेबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या वृत्ताबाबत मौन बाळगले आहे. याबाबत चीनमधील माध्यमांनीही कुठलेही वृत्त प्रसारित केले नाही. मात्र, तरीही क्षी जिनपिंग यांना पदच्यूत केल्याचा अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. या अफवा क्षी जिनपिंग यांच्याविरोधात रचल्या गेलेल्या कटाचा भाग असल्याचा दावा काही संकेतस्थळांनी केला आहे. क्षी जिनपिंग यांना चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मधून हटवण्यात आल्याचीही अफवा सोशल मीडियावर आहे.

आक्रमक चीनला ‘क्वाड’चा इशारा; हिंदू-प्रशांत क्षेत्राच्या स्थितीत एकतर्फी बदल नको

समरकंदमधील कार्यक्रमाची औपचारिक सांगता न करताच निघालेल्या जिनपिंग यांना बीजिंगमध्ये पोहोचताच अटक करण्यात आली असून त्यांना घरात स्थानबद्ध करण्यात आल्याचा दावा ट्विटरवर करण्यात आला आहे. बीजिंग विमानतळावरुन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत ६००० विमानांची उड्डाणं रद्द झाल्याचीही ट्विटर पोस्ट करण्यात आली आहे.

सुरक्षा परिषदेत एस. जयशंकर यांची चीनविरोधात कडक भूमिका, रशियावरही साधला निशाणा

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या १६ ऑक्टोबरला नियोजित बैठकीत जिनपिंग तिसऱ्यांदा चीनच्या अध्यक्षपदासाठी दावा करण्याच्या तयारीत असतानाच त्यांच्याविरोधात या अफवा पसरल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“काँग्रेसने ७० वर्षांत काय केलं” पंतप्रधानांच्या प्रश्नावर राहुल गांधींचे सडेतोड उत्तर, म्हणाले, ‘आम्ही भारताला…’

संबंधित बातम्या

“हिंमत असेल तर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधा”, आफताबचं पोलिसांना खुलं आव्हान, खूनाचं कारणही सांगितलं
“तुमच्या पक्षाचा एकही सदस्य लोकसभेत नाही तरी तुम्ही मंत्री कसे?” रामदास आठवलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
दिल्ली पालिकेत ‘आप’ची सत्ता; भाजपची १५ वर्षांची राजवट संपुष्टात, काँग्रेस आणखी क्षीण
Maharashtra Karnataka Border Dispute : सीमावादाचे लोकसभेत पडसाद; सुप्रिया सुळे, विनायक राऊत आक्रमक; महाविकास आघाडी खासदारांची घोषणाबाजी
“देशातील सर्वात छोट्या पक्षाने जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला हरवलं”, आपचा भाजपाला खोचक टोला

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द