राजस्थानच्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्या नावावर फेक व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तयार करुन त्याद्वारे आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजस्थानच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि ‘अर्बन इम्प्रुव्हमेंट’ या संस्थेच्या सचिव सुनीता चौधरी यांना टीना दाबींच्या नावाने अ‍ॅमेझॉन गिफ्ट कार्ड मागणारा संदेश मिळाला होता. याबाबत चौधरी यांनी शहानिशा केल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- खातेदारांचे Savings धोक्यात टाकणाऱ्या ‘या’ 8 बँकांना RBI चा दणका; तुमचे अकाउंट तर नाही ना? पहा यादी

दाबी असल्याचे भासवून लोकांकडून अ‍ॅमेझॉन कार्डची माग

पोलिसांनी डुंगरपूरमधून अटक केलेल्या या आरोपी युवकाने व्हॉट्सअ‍ॅपवर आयएएस अधिकारी टीना दाबी यांचा फोटो ‘प्रोफाईल पिक्चर’ म्हणून ठेवला होता. दाबी असल्याचे भासवून हा आरोपी लोकांकडून विविध रकमेच्या अ‍ॅमेझॉन कार्डची मागणी करत होता. अ‍ॅमेझॉन कार्डची मागणी करणारा हा संदेश बिनचूक इंग्रजीमध्ये पाठवण्यात येत होता. त्यामुळे बऱ्याच जणांना त्याच्यावर संशय देखील येत नव्हता.

घटनेची माहिती कळताच दाबी यांना धक्का

अशाचप्रकारचा संदेश आरोपीने सुनीता चौधरींना देखील पाठवला होता. हा संदेश खुद्द टीना दाबींनीच पाठवल्याचा समज सुरवातीला चौधरी यांना झाला. मात्र, या संदेशाद्वारे अ‍ॅमेझॉन कार्डची मागणी झाल्यानंतर चौधरींना संशय आला. त्यांनी लगेच याबाबत टीना दाबी यांना फोन करून विचारणा केली. या संदेशाबाबत ऐकताच दाबी यांना धक्का बसला. दाबी यांनी तात्काळ जैसलमेरच्या पोलीस अधिक्षकांना याबाबत माहिती दिली.

हेही वाचा- पंतप्रधान कार्यालयाकडून केंद्रीय मंत्र्यांची संपत्ती जाहीर; जाणून घ्या पंतप्रधान मोदींची संपत्ती किती वाढली

आरोपीस अटक

जैसलमेर पोलिसांच्या सायबर सेलने हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ट्रेस केल्यानंतर त्याचे लोकेशन डुंगरपूर जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आले. त्यानंतर डुंगरपूरच्या पोलिसांनी या युवकाचा शोध घेऊन त्याला अटक केली. या आरोपी युवकाची सध्या पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. अनोळखी क्रमाकांवरुन येणाऱ्या अशा संदेशांपासून दूर राहण्याचे आवाहन टीना दाबी यांच्याकडून करण्यात आले आहे. आपला एकच अधिकृत क्रमांक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ias teena dhabi named amazon gift card demanded by youth in dungarpur rvs
First published on: 09-08-2022 at 16:53 IST