man dies by heart attacke while praying at sai temple in Madhya Pradesh spb 94 | Loksatta

दुख:द! साईंच्या चरणी नमस्कार करण्यासाठी वाकला अन् हृदयविकाराचा झटका आला; तरुणाचा मृत्यू

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दुख:द! साईंच्या चरणी नमस्कार करण्यासाठी वाकला अन् हृदयविकाराचा झटका आला; तरुणाचा मृत्यू
फोटो सौजन्य – सोशल मीडिया

साईमंदिरात प्रार्थना करताना हृदयविकाराचा झटका आल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मध्यप्रदेशच्या कटनी येथे घडली आहे. राजेश मेहणी असे या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

हेही वाचा – भयंकर! आईने पोटच्या लेकराच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर, कारण वाचून धक्काच बसेल, Video होतोय तुफान Viral

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राजशे मेहणी, गुरुवारी साईमंदिरात दर्शन करण्यासाठी गेला होता. यावेळी नमस्कार करण्यासाठी खाली बसताच त्याला हृदयविकाराच झटका आला. १० मिनिटांपासून त्याची कुठलीच हालचाल न दिसल्याने उपस्थित पुजाऱ्यांनी इतर भाविकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा – VIDEO : “तुम्ही इथेही बुलडोझर चालवणार का?” पाटणा उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना सुनावले

दरम्यान, अशीच एक घटना शुक्रवारी मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये घडली. गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने चालकाचा मृत्यू झाला. तसेच यावेळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू अन्य काही जण जखमी झाले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून सौम्य हृदयविराकारांच्या घटांमध्ये वाढ झाली आहे. यावेळी छातीत दुखण्यासारखी लक्षणे न जाणवल्याने अनेकदा रुग्णांना आपल्या हृदयविकाराचा झटका आल्याचे कळत नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 15:30 IST
Next Story
भयंकर! आईने पोटच्या लेकराच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर, कारण वाचून धक्काच बसेल, Video होतोय तुफान Viral