मद्य न दिल्याने थेट बारमधील डीजे ऑपरेटरवर गोळीबार केल्याची धक्कादायक घडना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात संबंधित डीजे ऑपरेटरचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री १ च्या वाजताच्या सुमारास रांचीतील एक्सट्रीम बारमध्ये ही घटना घडली. संदीप असं य डीजे ऑपरेटरचं नाव असून रांची पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा – धक्कादायक : पानपट्टीचालकाची कुकरीने वार करून हत्या, बुलढाण्याच्या खामगावमधील थरार

टाईम्स ऑफ इंडियाने रांची पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी आणि त्याचे तीन सहकारी असे चार जण रविवारी रात्री १ च्या सुमारास रांची शहरातील चुटिया पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या एक्सट्रीम बारमध्ये मद्य पिण्यासाठी पोहोचले होते. मात्र, उशीर झाल्याने बार बंद झाल्याचं येथील कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितलं. तसेच मद्य देण्यास नकार दिला.

बार कर्मचाऱ्यांनी मद्य देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी थेट बारमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्याने चौघापैकी एकाने स्वत:च्या रायफलने थेट बारमधील डीजे ऑपरेटरच्या छातीत गोळ्या घातल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर डीजेला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा – गरिबीचं क्रौर्य! मातेनं प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी कोवळ्या जिवाचा ५ हजार रुपयांना केला सौदा

दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपी हा हाफ पॅंट आणि टीशर्ट घालून बारमध्ये दाखल झाल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे रांची पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे.