PT Usha nominated for Rajya Sabha: राष्ट्रपती नियुक्त खासदाराच्या यादीत चार जणांची वर्णी लागली आहे. बुधवारी भारतीय जनता पार्टीने ज्येष्ठ धावपटू पी. टी. उषा यांच्यासह प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा, समाजसेवक आणि धर्मस्थळ मंदिराचे प्रशासक वीरेंद्र हेगडे आणि प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांना राज्यसभा सदस्य म्हणून नामनिर्देशित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांचं अभिवादन केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं की, “पीटी उषा ह्या प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्थान आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांची कामगिरी सर्वश्रुत आहे. गेल्या काही वर्षांपासून नवख्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे त्यांचं कार्य तितकेच कौतुकास्पद आहे. राज्यसभेसाठी नामनिर्देशन झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन.”

अन्य एक ट्वीट करत त्यांनी इलैयाराजा यांचं देखील अभिनंदन केलं आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, इलैयाराजा यांनी आपल्या सर्जनशील प्रतिभेने प्रत्येक पिढीतील लोकांना भुरळ घातली आहे. त्यांचं कामं अनेक मानवी भावनांना सौंदर्यपूर्ण पद्धतीने प्रतिबिंबित करतं. त्यांचा जीवनप्रवास देखील तितकाच प्रेरणादायी आहे. प्रतिकूल परिस्थितीतून येऊनही त्यांनी खूप काही मिळवलं आहे. राज्यसभेसाठी त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याचा मला आनंद आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pt usha nominated for rajya sabha greetings from pm narendra modi rmm
First published on: 06-07-2022 at 21:53 IST