श्रद्धा वालकरचा निर्घृणपणे खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावाला याच्यावर जेलमध्ये पाळत ठेवण्यात येत आहे. आफताब सध्या तिहार जेलमध्ये बंद असून, तो आत्महत्या करु शकतो अशी भीती पोलिसांना आहे. यामुळे सतत आफताबवर लक्ष ठेवलं जात असल्याचं सूत्रांची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आफताब स्वत:ला नुकसान पोहोचवू शकतो अशी कोणतीही गोष्ट त्याच्याजवळ ठेवू नका अशा सूचनाच जेलमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आफताब जेल क्रमांक ४ मध्ये बंदिस्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा विक्षिप्त स्वभाव लक्षात घेता सावधगिरीचा उपाय म्हणून हे आदेश देण्यात आले आहेत.

पोलीस कोठडीत आफताब अत्यंत शांत असल्याने पोलिसांना आश्चर्यही वाटत आहे. आफताबच्या कोठडीत दोन कैद्यांना ठेवण्यात आलं असून, त्यांनाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. आफताबने चांगली झोप काढली असून, त्यांच्याशी गप्पाही मारल्या आहेत. दरम्यान आज आफताबची पुन्हा एकदा पॉलिग्राफी चाचणी होणार आहे. यानंतर त्याची नार्को चाचणी केली जाईल.

‘I Have Got News’, श्रद्धाचं शेवटचं चॅट आलं समोर, मृत्यूच्या काही तास आधीच मित्राला पाठवला होता मेसेज

सूत्रांच्या माहितीनुसार, आफताब सकाळी ६ वाजता उठला आणि नाश्ता केला. जेलमधील कर्मचाऱ्यांशी बोलताना त्याला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप वाटत असल्याचं दिसत नव्हतं. यावेळी त्याने त्याच्यासहित कोठडीत बंद असणाऱ्या दोघांना जेलमधील प्रक्रियेबाबत विचारणाही केली.

Shraddha Walkar Murder: श्रद्धाच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये नेमकं काय होतं? ‘Happy Days’ असं का म्हटलं होतं?

“आफताबने त्यांना आपण पहिल्यांदाच जेलमध्ये आलो असून, जेवणाचा दर्जा, वेळा आणि इतर सुविधांबाबत जाणून घ्यायचं असल्याचं सांगितलं,” अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

PHOTOS: मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आफताब रोज श्रद्धाचा चेहरा पाहायचा, धक्कादायक खुलासे ऐकून पोलीसही चक्रावले

“त्याला चालण्यासाठी बाहेर जायचं होतं, पण जोखीम पाहता त्याची विनंती फेटाळण्यात आली. कैदी अनेकदा एकमेकांशी आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल चर्चा करत असतात. पण जेव्हा त्याला श्रद्धाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो शांत बसला,” अशी माहितीही दिली आहे. दरम्यान कोठडीतील दोन्ही कैद्यांना आफताबसह त्याच्या गुन्ह्याबद्दल चर्चा न करण्यास सांगण्यात आलं आहे. रविवारी त्याला वृत्तपत्र पुरवण्यात आलं नाही.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर आफताबला कोठडीतून बाहेर जायचं असेल तर कारागृहाचे दोन कर्मचारी सतत त्याच्यासह असणार आहेत. दरम्यान कारागृह अधिकाऱ्यांना मिळालेल्या सूचनेनुसार, आफताबला २८, २९ नोव्हेंबर आणि २ डिसेंबरला चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. नार्को चाचणीआधी आफताबची पॉलिग्राफ चाचणी केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shraddha murder case tihar jail official keeping eye on aftab as they fear he may commit suicide sgy
First published on: 28-11-2022 at 09:00 IST