इस्रायल आणि पॅलेस्टीन युद्धातला संघर्ष शमलेला नाही. अशात इराणने इस्रायलवर हल्ला केला. पहिल्याच हल्ल्यात शेकडो क्षेपणास्त्रं आणि ड्रोन लाँच करण्यात आले. शनिवारी रात्री म्हणजेच १३ एप्रिलच्या रात्री झालेल्या या हल्ल्यानंतर तेल अवीव आणि जेरुसलेमसह संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन घुमले. तसंच स्फोटांचेही आवाज आले. मात्र हाच हल्ला करणं इराणला भोवणार आहे. कारण अमेरिकेने एक मोठं पाऊल यानंतर उचललं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेने काय म्हटलं आहे?

अमेरिकेने मंगळवारी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांबाबत भाष्य केलं आहे. इराणच्या मिसाइल आणि ड्रोन प्रोग्रामवर आम्ही कठोर निर्बंध लादणार आहोत. याबाबत आम्हाला आमच्या सहाकाऱ्यांकडूनही सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलविन यांनी इराणच्या मिसाईल आणि ड्रोन प्रोग्रामवर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे.

हे पण वाचा- इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन

इराणने शनिवारी इस्रायलवर ३०० क्षेपणास्त्रं डागली होती. तसंच ड्रोन हल्लेही केले होते. यानंतर अमेरिकेने आता इराणच्या विरोधात मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे इस्रायलवर हल्ला करण्याचा निर्णय घेणं इराणला भोवण्याची चिन्हं आहेत. सुलिवन म्हणाले, “येत्या काही दिवसांमध्ये अमेरिका इराणवर निर्बंध लादणार आहे. त्यांच्या मिसाइल आणि ड्रोन डागण्याच्या संख्येवर हे निर्बंध असतील. तसंच नवी मार्गदर्शक तत्त्वेही त्यांना आखून दिली जातील. आमचे सहकारी आम्हाला या निर्णयात साथ देतील अशी अपेक्षा आहे.” असंही सुलिवन यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय घडलं?

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प (IRGC) ने हल्ल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिल रोजी “सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासाला लक्ष्य करण्याच्या झिओनिस्ट घटकांच्या गुन्ह्यासाठी” शिक्षेचा भाग म्हणून “ट्रू प्रॉमिस” ऑपरेशन अंतर्गत ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सुरू करण्यात आली आहेत.

दमास्कसमधील हल्ल्यात IRGC च्या एलिट कुड्स फोर्समधील दोन वरिष्ठ जनरल्ससह १२ लोक ठार झाले होते. इस्रायलने वाणिज्य दूतावास हल्ल्याची जबाबदारी घेतली नव्हती किंवा नाकारली सुद्धा नव्हती. दरम्यान, अमेरिकेला संघर्षापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. इस्त्रायलचे गाझावरील युद्धाचे सहा महिने झाले आहेत. त्यामुळे आखाती प्रदेशांमध्ये तणाव वाढवला आहे. हा वणवा आता लेबनॉन आणि सीरियासह आघाडीवर पसरला आहे. आता अमेरिकेने या सगळ्या पार्श्वभूमीवर इराणवर प्रतिबंध लादण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us to impose new sanctions against iran after attack on israel scj