भारताने येत्या काळात रशियन लष्करी उपकरणावरील आपले अवलंबित्व कमी करावे, अशी अपेक्षा अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी मंगळवारी व्यक्त केली. तसेच रशियाकडून संरक्षण उपकरणांची खरेदी करणं भारताच्या हिताचे नाही, असा इशाराही अमेरिकेने दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


ऑस्टिन यांनी सदन सशस्त्र सेवा समितीच्या सदस्यांना वार्षिक संरक्षण बजेटवरील कॉंग्रेसच्या सुनावणी दरम्यान सांगितले की, “आम्ही भारतासोबत काम करत आहोत आणि रशियन उपकरणांमध्ये गुंतवणूक करणे त्यांच्या हिताचे नाही, हे त्यांना समजले आहे. तसेच आमची पुढची मागणी ही आहे की, भारत ज्या रशियन उपकरणांमध्ये गुंतवणूक करत आहेत, ते कमी करा आणि अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अधिक गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे आपले संबंध सुरळीत राहतील,” असं ऑस्टिन म्हणाले.


रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाबद्दल भारताच्या भूमिकेवर टीका करणारे काँग्रेस सदस्य जो विल्सन यांच्या प्रश्नाला संरक्षण सचिव उत्तर देत असताना ही टिप्पणी केली. “आपला मित्र भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असून अमेरिकन आणि सहयोगी पर्यायांपेक्षा रशियन शस्त्रास्त्र प्रणाली निवडून स्वतःला क्रेमलिनशी तुलना करण्याचा पर्याय निवडत आहे, हे भयानक आहे,” असं विल्सन म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us wants india to cut defence buying from russia hrc