गोव्यात पक्षांतराचे वारे वेगात ; भाजपला दुहेरी धक्का : एका मंत्र्यासह आमदाराची सोडचिठ्ठी

राज्यातील जनता भाजपच्या कारभारावर समाधानी नाही, असा दावा लोबो यांनी केला.

पणजी : विधानसभा निवडणूक जाहीर होताच गोव्यात पक्षांतराचे वारे वेगाने वाहू लागले आहेत़  विज्ञान- तंत्रज्ञानमंत्री, भाजप आमदार मायकेल लोबो आणि आमदार प्रवीण झान्टे यांनी सोमवारी भाजपचा राजीनामा दिला़

लोबो यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालय आणि विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा पाठवला़ मंत्रिपदाबरोबरच आमदारकी आणि पक्षाचाही राजीनामा दिल्याचे लोबो यांनी स्पष्ट केल़े  ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आह़े  लोबो कळंगुटचे आमदार होते.  लोबो यांच्या पाठोपाठ मये विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रवीण झान्टे यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली़ ते ‘मगोप’मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आह़े

राज्यातील जनता भाजपच्या कारभारावर समाधानी नाही, असा दावा लोबो यांनी केला. भाजपमध्ये सामान्य कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी टीका त्यांनी केली. तर बेरोजगारीसारख्या अनेक मुद्दय़ांवर सरकार अपयशी ठरल्याची टीका प्रवीण झान्टे यांनी केली़  दरम्यान, या राजीनामासत्रामुळे निवडणुकीत भाजपला काहीच फरक पडणार नसल्याचा दावा पक्षाने केला़ काही जणांनी राजीनामा दिला असला तरी गोव्यातील जनता पुन्हा भाजपला सत्तेची संधी देईल, असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला़

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goa assembly poll minister michael lobo mayem mla pravin zantye quit bjp zws

Next Story
UP Elections: या ८० विरुद्ध २० टक्क्यांच्या लढाईत ब्राह्मण करणार नेतृत्वः योगी आदित्यनाथ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी