कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १५ जणांना शुक्रवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सर्वांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे आदी उपस्थित होते.
रग्बीचा झेंडा
पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात २०२२- २३ वर्षांसाठी कस्तुरी सावेकर ( गिर्यारोहण), प्रतीक पाटील (सायकलिंग), शाहू माने (नेमबाजी), नंदिनी साळुंखे (कुस्ती), वैष्णवी पाटील रघुवी श्रीधर निगडे (रग्बी), दिव्यांग खेळाडू आफ्रिद अत्तार (जलतरण) व अन्नपूर्णा कांबळे (ॲथलेटिक्स) यांना तर २०२३-२४ वर्षासाठी मानसिंग यशवंत पाटील (दिव्यांग खेळाचे क्रीडा मार्गदर्शक), किरण पांडुरंग भोसले (ॲथलेटिक्स), कल्याणी पाटील आणि पृथ्वीराज बाजीराव पाटील (रग्बी), अभिषेक सुरेश निपाणी (वेटलिफ्टिंग) सृष्टी जयवंत भोसले (कुस्ती) व ऐश्वर्या पुरी (सॉफ्टबॉल) यांना गौरवण्यात आले.
© The Indian Express (P) Ltd