कोल्हापूर : शिरढोण येथे अपघात दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एकजण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. इचलकरंजीहुन फारुख शेख हे कार्यक्रमासाठी कुरुंदवाडच्या दिशेने जात होते. तर सलीम इंचलकरंजे हे कुरुंदवाडहुन इचलकरंजीकडे जात होते.

एकमेकांची समोरासमोर जोराची धडक झाली. ही धडक इतक्या जोरात झाली की त्याच्या जोरदार आवाजाने आजुबाजुला असलेले नागरिक गोळा झाले.

हेही वाचा…लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात न गुंतता विधानसभेच्या तयारीला लागावे, धनंजय महाडिक यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन

त्यामध्ये आलासचे सलीम इंचलकरंजे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला. तिघा जखमींना इतर लोकांनी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले.