ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतासाठी चांगला ठरला. महेश भूपती आणि त्याचा सहकारी डॅनियल नेस्टोर यांनी पुरुष दुहेरीत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. लिएण्डर पेसने मिश्र दुहेरीत सहकारी एलेना व्हेसनिनाबरोबर विजयी सलामी दिली आहे. रोहन बोपण्णाला पुरुष दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला असला तरी मिश्र दुहेरीत मात्र त्याला विजय मिळवता आला आहे. भूपती आणि नेस्टोर जोडीने पाचव्या मानांकित व्हिक्टोर हॅनेस्कू आणि स्लोव्हाक मार्टिन यांचा ६-१, ७-६ (८) असा पराभव केला. त्यांचा तिसऱ्या फेरीतील सामना सिमोन बोलेली आणि फॅबियो फोगनिनी यांच्याशी होणार आहे.पेस आणि व्हेसनिना यांनी पाकिस्तानच्या ऐसाम कुरेशी आणि सोफिया ऑरव्हिडसॉन यांचा पहिल्या फेरीत ६-७ (८), ६-४, १०-७ असा पराभव करीत विजयी सलामी दिली.
पुरुषांच्या दुहेरीत आव्हान संपुष्टात आलेल्या बोपण्णाने मिश्र दुहेरीत सू-वेई-हिएशबरोबर खेळताना अ‍ॅशलेइघ बार्टी आणि जॅक सॉक यांचा ६-३, ६-३ असा सहज पराभव केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhupati and paes forward in doubles