Premium

IND vs AUS: ‘अपील करण्याच्या आधीच दिले आऊट!’ नितीन मेननने विराटला पुन्हा LBW दिल्याने चाहत्यांचा सोशल मीडियावर संताप

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात विराट कोहली आणि नितीन मेनन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून एक सुप्त अशा प्रकारचा संघर्ष सुरु आहे. त्याचाच पुढचा अंक एकदिवसीयमध्ये पाहावयास मिळाला.

IND vs AUS: Given out before appeal Fans rage on social media after Nitin Main gives Virat LBW again

Virat Kohli and Nitin Menon: विशाखापट्टणममध्ये खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहली पुन्हा एकदा मोठी इनिंग खेळू शकला नाही. विराटचे चाहते आणि टीम इंडियाला आशा होती की, रन मशीन कोहली या सामन्यात नक्कीच शतक करेल. विशाखापट्टणममध्ये कोहलीचा रेकॉर्डही खूप चांगला राहिला आहे पण चांगली सुरुवात करूनही कोहलीला मोठी इनिंग खेळता आली नाही. विराट ३५ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. दुसरीकडे, विराटची विकेट पडली तेव्हा अंपायर दुसरे कोणी नसून नितीन मेनन होते, त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहली स्टार्कच्या चेंडूवर LBW आऊट

वास्तविक, टीम इंडियाच्या डावाच्या पाचव्या षटकात अनुभवी गोलंदाज मिचेल स्टार्क गोलंदाजी करायला आला. या षटकातील पाचवा चेंडू त्याने कोहलीला टाकला. विराटने लेग साइडच्या खाली फटका मारण्यासाठी विकेट लाइनवर फ्लिक केला पण चेंडू पुढच्या पायाच्या पॅडला लागला. त्यानंतर गोलंदाजाने एलबीडब्ल्यूचे अपील केले आणि अंपायर नितीन मेनन यांनी त्याला बाद घोषित दिले. मेनन यांनी बाद केल्यानंतर कोहलीने रिव्ह्यू करण्याचा विचारही केला नाही आणि तो तंबूत परतला. पहिल्या एकदिवसीय डावातील एका चौकारामुळे त्याला ९ चेंडूत ४ धावा करता आल्या. विराट बाद झाल्यामुळे चाहते चांगलेच संतापले आणि त्यांनी अंपायरला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

नितीन मेनन झाले ट्रोल

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात देखील विराट कोहलीला नॅथन एलिसने एलबीडब्ल्यू आऊट केले. विराट आऊट झाला तेव्हा नितीन मेनन अंपायरिंग करत होते. मेननने यांनी कोहलीला यापूर्वीही अनेकदा चुकीचे आऊट दिले आहेत. या सामन्यातही मेननने एलबीडब्ल्यूच्या अपीलवर बोट उचलण्यास उशीर केला नाही. कोहली त्या सामन्यात बाद होता पण तरीही कोहलीचे चाहते नितीन मेनन यांना ट्रोल करत आहेत.

हेही वाचा: Asia Cup 2023: टीम इंडिया पाकिस्तानला जाण्याबाबत भारत सरकारने बीसीसीआयच्या कोर्टात टाकला चेंडू, अनुराग ठाकूर यांचे मोठे विधान

सामन्यात काय झाले?

भारतीय संघ या सामन्यात मालिका जिंकण्याच्या उतरला होता. मात्र, मिचेल स्टार्कच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजी विभागाने भारतीय फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडले. स्टार्कच्या ५ बळींमुळे भारताचा डाव अवघ्या ११७ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्श व ट्रेविस हेड या दोन्ही सलामवीरांनी अर्धशतके करत संघाला दहा गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियन संघाने आपल्याला मिळालेले आव्हान केवळ ११ षटकांमध्ये पूर्ण केले. चेंडू राखून झालेला भारतीय संघाचा हा वनडे इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला. भारतीय संघाला २३४ चेंडू राखून या पराभवाला सामोरे जावे लागले. यापूर्वी भारताला न्यूझीलंडकडून २१२ चेंडू राखून सर्वात मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-03-2023 at 16:16 IST
Next Story
Virender Sehwag: ‘…म्हणून सचिनने मला लाइव्ह सामन्यात बॅटने मारले’, वीरेंद्र सेहवागने केला खुलासा