महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) नेतृत्व करताना दिसणार आहे. चेन्नईने अलीकडेच आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी चार क्रिकेटपटूंना त्यांच्या संघात कायम ठेवले आहे. धोनीशिवाय या चार खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंची घोषणा करताना संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीने धोनीच संघाचा कर्णधार असेल, असे स्पष्ट केले. धोनीनेही काही वेळापूर्वी आपली इच्छा व्यक्त केली होती की, त्याला आपला शेवटचा टी-२० सामना चेपॉक येथे खेळायचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

असे असले, तरी चेन्नईला जुन्या खेळाडूंशी संबंध तोडावे लागले आहेत. ड्वेन ब्राव्होपासून सॅम करनपर्यंत आणि सुरेश रैना ते अंबाती रायुडूपर्यंत अनेक जुन्या खेळाडूंना चेन्नईने लिलावात पाठवले आहे. मात्र, आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात संघाला आपले जुने खेळाडू मिळतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा – IND vs NZ : विराटचं ‘कमबॅक’ फसलं..! मुंबईत भारताचा कप्तान शून्यावर बाद; ‘असा’ काढला राग; पाहा VIDEO

चेन्नई सुपर किंग्जने चार खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत आणि त्यांच्याकडे ४८ कोटी रुपये शिल्लक आहेत. लीगच्या १५ व्या हंगामासाठी चेन्नईच्या योजनांबद्दल बोलताना, फलंदाज रॉबिन उथप्पाने एका अनुभवी खेळाडूचे नाव दिले आहे, जो मेगा लिलावात चेन्नईची पहिली निवड असेल.

मेगा लिलावात चेन्नई सुरेश रैनाला संघात घेण्यासाठी चेन्नई सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे उथप्पाला वाटते. स्टार स्पोर्ट्सवर उथप्पा म्हणाला, “रैना ही चेन्नईची पहिली पसंत असेल, तो सीएसकेचा सर्वात मोठा दिग्गज आहे. गेल्या १०-१२ वर्षात संघाला बाद फेरीत पात्र होण्यास मदत करणारा तो महत्त्वाचा व्यक्ती आहे.”

आयपीएलमध्ये आता १० संघ सहभागी होणार आहेत. जुन्या आठ फ्रेंचायझींना आधी खेळाडूंना कायम ठेवण्याची संधी देण्यात आली होती. आता दोन नवीन संघांना त्यांच्या आवडीचे खेळाडू निवडण्याची संधी दिली जाणार आहे. फ्रेंचायझींनी ज्या खेळाडूंना सोडले आहे, दोन नवीन फ्रेंचायझी या खेळाडूंना त्यांच्या संघात समाविष्ट करू शकतात.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 robin uthappa feels suresh raina will be csk first pick at mega auction adn
First published on: 03-12-2021 at 16:44 IST