Rohit Sharma praises net bowler video viral ahead Champions Trophy 2025 : भारतीय संघाने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तयारी सुरू केली आहे. संघ रविवारपासून दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध आहे. मंगळवारी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने यूएईचा नेट बॉलर अवैस अहमदच्या बॉलिंगचे कौतुक केले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज त्याच्या इनस्विंगने त्याच्या पायांना लक्ष्य करत असताना रोहितने त्याची मस्करीही केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मा अवैस म्हणाला, “क्लास बॉलर, तू माझ्या बुटाला लक्ष्य करत होतास. तसेच तू इनस्विंग यॉर्करने माझा पाय मोडण्याचा प्रयत्न करत होतास. खूप छान भाई. तुम्ही इथे आम्हाला सरावासाठी मदत करत आहात. मला हे खूप आवडले, धन्यवाद.” गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा खराब फॉर्मशी झुंज देत होता. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ११९ धावांची दमदार खेळी साकारली.

रोहितने शेवटच्या वेळी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळताना ५५ चेंडूत ४८ धावा केल्या होत्या. दुबईमध्ये रोहितचा रेकॉर्ड चांगला आहे, त्याने पाच एकदिवसीय डावांमध्ये १०५.६६ च्या सरासरीने ३०३ धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याचा बांगलादेशविरुद्धही रेकॉर्ड चांगला आहे. त्याने १७ डावात ७८६ धावा केल्या आहेत. त्याने बांगलादेशविरुद्ध तीन शतकं आणि तितकीच अर्धशतकं झळकावली आहेत.

टीम इंडियाचा दुबईत टॉप-क्लास रेकॉर्ड –

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रोहितच्या संघाला रोखणे कोणत्याही विरोधी संघासाठी सोपे नसेल. हे आम्ही म्हणत नाही आहोत, पण टीम इंडियाची अतुलनीय आकडेवारी ओरडून सांगत आहे आणि साक्ष देत आहे की यावेळी जेतेपद आपलेच आहे. टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळायचे आहेत. आता जर तुम्हीही भारतीय क्रिकेटचे चाहते असाल आणि या स्पर्धेत टीम इंडिया चॅम्पियन व्हावी अशी प्रार्थना करत असाल तर तुमच्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

भारतीय संघाने दुबईमध्ये आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले आहेत, ज्यापैकी एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. टीम इंडियाने पाच सामने जिंकले आहेत आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे. आता जर रोहितची सेना दुबईमध्ये हा विक्रम राखण्यात यशस्वी झाली तर टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली असेल.


मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma impress with uae bowler awais ahmad who help him during net session for champions trophy 2025 vbm