Shakib Al Hasan: बांगलादेशमधील अराजकतेदरम्यान संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. या संघात अष्टपैलू शकीब अल हसनच्या नावाचाही समावेश आहे. शेख हसीनाच्या सरकारमध्ये शकीब अल हसन खासदार होते. त्यामुळे त्याच्या संघात पुनरागमनाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. पण संघात शकीबला संधी दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बांगलादेशमधील सरकार बरखास्त झाल्यानंतर काही दिवसांनी, शेख हसीना यांच्या सरकारमध्ये माजी खासदार असलेला क्रिकेटपटू शकीब अल हसन याला आगामी पाकिस्तान दौऱ्यावर राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा – Shakib Al Hasan: शकीबचा सुपर ओव्हर खेळायला नकार; स्पर्धेतून बाहेर पडण्याची ओढवली नामुष्की-जेतेपदही गमावलं

शकीब अल हसनने अवामी लीग पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, बांगलादेशातील राजकीय गदारोळानंतर हसनला आपले पद गमवावे लागले. बांगलादेश क्रिकेट बोर्डात त्याच्या समावेशाला विद्यमान कार्यवाह क्रीडा मंत्री आसिफ महमूद यांनी मान्यता दिली आहे. “आम्ही क्रीडा सल्लागारांसमोर संघ सादर केला. शकीबच्या समावेशाला त्यांनी विरोध केला नाही. ते पुढे म्हणाले की संघ गुणवत्तेवर तयार केला पाहिजे,” बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे संचालक इफ्तेखार अहमद यांनी एएफपीला सांगितले.

हेही वाचा – Vinesh Phogat: ‘१५-१५ रूपयांत मेडल खरेदी करा…’ विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची धक्कादायक पोस्ट, पीटी उषानेही सुनावलं

एएफपीच्या वृत्तानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे माजी सदस्य रफिकुल इस्लाम या निर्णयावर खूश नाहीत. ते म्हणाले, “कायदा तयार करणाऱ्यांमध्ये शकीबचाही समावेश होता. लोकांच्या हत्येला शकिबही जबाबदार आहे. विद्यार्थ्यांची हत्या झाली तेव्हा त्यांनी कधीही विरोध केला नाही. यातील अनेक विद्यार्थ्यांनी त्याला आपला आदर्श मानले. त्याने आधी परत येऊन या सर्व गदारोळात त्याने काहीच प्रतिक्रिया का दिली नाही, हे सांगायला हवे.” बांगलादेशमधील सरकार बरखास्त झाल्यापासून शकीबकडून कोणतीही जाहीर प्रतिक्रिया आलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakib al hasan cannot avoid the responsibility of mass killings in bangladesh says former bcb member ban vs pak test series bdg
Show comments