Umpire Anil Chaudhary on Mohammed Rizwan Appeal Video: पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानची गणना जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते. आत्तापर्यंत रिझवानने पाकिस्तानसाठी अनेक सामने जिंकले आहेत आणि संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, रिझवानची वाईट सवय म्हणजे तो खूप अपील करतो. त्याच्या या कृतीमुळे विरोधी संघालाच नव्हे तर पंचांनाही खूप त्रास होतो. याप्रकरणी भारतीय पंच अनिल चौधरी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रिझवानने कितीही आवाहन केले तरी आपण त्याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?

यष्टिरक्षक हा क्रिकेटच्या मैदानावर सर्वाधिक विकेटसाठी अपील करत असतो, पण त्यालाही मर्यादा असते. प्रत्येक चेंडूवर विनाकारण ओरडणारे आणि अवास्तव मागणी करणारे यष्टिरक्षक पंचांच्या नजरेत अडचणीत येतात, त्यामुळे त्यांना अनेकदा नुकसान सहन करावे लागते. पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानचीही अशीच प्रतिमा तयार झाल्याचे दिसते. आता पंच त्याला गांभीर्याने घेत नाहीत. असे स्वत: आयसीसी मान्यताप्राप्त पंच अनिल चौधरी म्हणाले.

हेही वाचा – PAK vs BAN: मोहम्मद रिझवानचे द्विशतक होण्यापूर्वीच शान मसूदने पाकिस्तानचा डाव का घोषित केला? सौद शकिलचे मोठे वक्तव्य

मोहम्मद रिझवान हा एक उत्कृष्ट यष्टीरक्षक आहे पण त्याला अपील करण्याच्या सवयीमुळे त्याच्या सहकारी खेळाडूंनाही अडचणींचा सामना करावा लागतो. रिझवानच्या अपीलमुळे पाकिस्तानी कर्णधार डीआरएस घेतो आणि नंतर तो नॉटआऊट असल्याचे तुम्ही पाहिले असेल. भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान, रिझवान खूपदा अपील करतो, ज्यामुळे तो पंचांवर दबाव आणतो जेणेकरून फलंदाजाला बाद घोषित केलं जाईल.

रिझवान प्रत्येक बॉलवर अपील करतो, कबुतरासारखा उड्या मारत राहतो अंपायरचे वक्तव्य

२ स्लोगर्स पोडकास्टमध्ये बोलताना भारतीय पंच अनिल चौधरी म्हणाले, “आशिया कपमध्ये मी अंपायरिंग केले. तो खूप अपील करतो. मी इतर पंचांनाही त्याच्या अपीलबाबत सतर्क राहण्यास सांगितले. यानंतर रिजवानने विकेटसाठी खूप जोरदार अपील केले आणि दुसऱ्या पंचांनी सांगितले की मी आऊट देणार होतो पण नंतर मला आठवलं की तुम्ही त्याच्याबाबत आम्हाला आधीच इशारा दिला होता. नंतर तो फलंदाज नाबाद होता. तो प्रत्येक चेंडूवर ओरडतो. तोच ना जो लिपस्टिकसारखं काहीतरी लावून येतो. तो कबुतरासारखा उड्या मारत राहतो.

हेही वाचा – Rahul Dravid: “जास्त पैसे मिळाले तर…” बायोपिकमध्ये कोणता अभिनेता तुमची भूमिका चांगली साकारेल? राहुल द्रविडने दिलं भन्नाट उत्तर

सर्व विकेटकिपर्सना दिली सक्त ताकीद

पंच अनि चौधरी पुढे म्हणाले, “बघा, खरं तर एक चांगला कीपर कोण आहे हे एका चांगल्या पंचाला माहित असते. सर्व विकेटकिपर्सने आज ऐका. उगीच जर कोणी अपील केली तर जो निर्णय तुमच्या बाजूने असेल तर तोही मिळणार नाही, हा सर्व विकेटकिपर्साठी इशार आहे आणि इतकं तंत्रज्ञान आलंय, कशाला तुमचं हसं करून घेताय? चुकीचा निकाल आला तर लोक तुमची चेष्टा करतील.”

रिझवान सध्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात व्यस्त आहे. पहिल्या डावात त्याने १७१ धावांची जबरदस्त खेळी केली. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रिझवान आपल्या खेळीदरम्यान नाबाद राहिला. याच कारणामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.