Premium

प्रसूतीनंतर निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या तुम्हाला माहीत आहेत का ?

प्रसूतीनंतरचे पहिले सहा आठवडे हे सर्वात धोकादायक असतात. या सहा आठवड्यांत शारीरिक त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यानंतरही वर्षभर त्रास होऊ शकतो.

pregancy_care_Loksatta
(ग्राफिक्स प्राजक्ता राणे )

बाळंतपणाच्या आधी आणि बाळंतपणानंतर कोणत्याही प्रकारची गुंतागुंत होऊ शकते. जर गर्भवती स्त्रीला उच्च रक्तदाब, मधुमेह असे काही आजार असतील तर बाळंतपण जोखमीचे ठरू शकते. यासाठी गर्भारावस्थेत मातेची काळजी घेणे आवश्यक आहे, तेवढेच बाळंतपणानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. बाळ झाल्यावर बाळाची काळजी घेण्यास जास्त प्राधान्य दिले जाते. यामुळे मातेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. प्रसूतीनंतरही स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ यांच्याकडून नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे. परंतु, बऱ्याच माता आरोग्य तपासणी करताना दिसत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसूतीनंतर गुंतागुंत कधी वाढते ?

प्रसूतीनंतरचे पहिले सहा आठवडे हे सर्वात धोकादायक असतात. या सहा आठवड्यांत शारीरिक त्रास होण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यानंतरही वर्षभर त्रास होऊ शकतो. अटलांटा येथील मोरेहाऊस स्कूल ऑफ मेडिसिन येथे प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्राच्या साहाय्यक प्राध्यापिका डॉ. चेरिल फ्रँकलिन यांच्या मतानुसार, प्रसूतीनंतर संपूर्ण एक वर्ष असुरक्षित आणि धोकादायक काळ असतो.

सर्वात जास्त धोका कोणाला आहे?

प्रसूतीनंतरच्या काळात पाश्चात्त्य महिलांपेक्षा पौर्वात्य महिलांना त्रास होण्याची शक्यता अधिक असते. परंतु, मूळ अमेरिकन महिलांनाही बाळंतपणाचा त्रास होतो. ३५ हून अधिक वय असणाऱ्या महिला, सिझेरियन सेक्शन झालेल्या महिला, ज्या महिलांचे नवजात बाळ मृत झाले आहे अशा महिला, अतिप्रमाणात वजन आणि जाडी असणाऱ्या महिला, हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या महिला, योग्य काळजी न घेता रुग्णालयातून डिस्चार्ज दिलेल्या महिला यांना प्रसूतिपश्चात त्रास होण्याची शक्यता असते.

हेही वाचा : गोवा राज्य का साजरे करते दोन राज्य दिन ? गोवा मुक्ती दिन आणि गोवा स्थापना दिन यांचा काय आहे इतिहास

प्रसूतीनंतर दिसणारी शारीरिक लक्षणे

बाळंतपणानंतर काही लक्षणे आपल्याला धोक्याची सूचना देत असतात. अशी लक्षणे ओळखून त्वरित उपचार घेतले पाहिजे. प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे – तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, दिसण्यामध्ये (दृष्टीमध्ये) बदल होणे, १०० अंशाहून अधिक ताप येणे, चेहरा आणि हातांना सूज येणे, श्वसनाचे विकार जाणवणे, छातीत दुखणे, हृदय धडधडणे, तीव्र मळमळ, उलट्या होणे, तीव्र पोटदुखी, हात-पाय लाल होणे, योनीमार्गातून जास्त रक्तस्राव होणे, जास्त थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांशी अथवा प्रसूतितज्ज्ञांशी संपर्क करा.

बाळंतपणाचा काळ अवघड गेला असल्यास आणि कोणत्याही प्रसूतीनंतर समस्या निर्माण होऊ शकतात का ?

हो. नॉर्मल अथवा सिझेरियन सेक्शन डिलिव्हरी झाली असल्यास, योग्य वयात अथवा उपचार घेऊन गर्भधारणा झाली असल्यास कोणत्याही बाळंतपणाच्या काळात प्रसूतिपश्चात समस्या निर्माण होऊ शकतात. मातेचा आरोग्याच्या बाबत असणारा कौटुंबिक इतिहास, मातेला असणारे आजार, मधुमेह, तसेच वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा झाल्यास प्रसूतीनंतर समस्या निर्माण होऊ शकतात. नऊ महिन्यांच्या आधीच बाळ जन्मास आल्यास बाळासह आईचीही काळजी घेणे तेवढेच आवश्यक ठरते. सिझेरियन सेक्शनमुळे संसर्ग, रक्ताच्या गुठळ्या, रक्तस्राव होऊ शकतो. त्यामुळे बाळ आणि आई या दोघांचीही काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
मातेच्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही जपणे तेवढेच आवश्यक आहे. भीती, चिंता, प्रसूतीच्या त्रासदायक आणि जबाबदारीचा अनुभव यामुळे पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर होऊ शकतात, असे मानसशास्त्रज्ञ कातायुने केनी यांनी सांगितले. प्रसूतीनंतरच्या तपासणीदरम्यान सर्व महिलांची नैराश्यासाठी तपासणी केली पाहिजे.

हेही वाचा : विश्लेषण : दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून कवी मोहम्मद इक्बाल यांना वगळण्याची शक्यता ? कोण आहेत मोहम्मद इक्बाल ? त्यांना ‘पाकिस्तानचे जनक’ का म्हटले ?

बाळंतपणाच्या आधी काय काळजी घ्याल ?

तुम्ही बाळाचा विचार करत असाल तर गरोदरपणाच्या आधी जोडीदारासह स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा फॅमिली डॉक्टरांची भेट घ्या. वैयक्तिक समस्या, आजारपण, कुटुंबातील आजारपणे यांची त्यांना कल्पना द्या. फ्रँकलिन यांच्या मते, गर्भधारणेपूर्वी आरोग्याच्या सर्व तपासण्या आणि लसीकरण करून घ्या. तुमचे शरीर प्रसूतीसाठी योग्य करा. उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांवर योग्य उपचार घ्या. गरोदरपणाच्या आधी, गरोदरपणात आणि बाळ झाल्यानंतरही मातेचे आरोग्य हे महत्त्वाचे असते.

हेही वाचा : विश्लेषण : रविवारनंतर सोमवारच का येतो ? आठवड्याची रचना कोणी केली ?

बाळंतपणानंतर रडायला येणे सामान्य आहे का ?

पहिल्या बाळंतपणावेळी, तसेच नूतन मातांना बाळंतपणानंतर तणाव जाणवू शकतो, वाईट वाटू शकते. काळजी वाटू शकते. त्यामुळे रडायला येते. काही वेळा हे क्षणिक असते. परंतु, असे सतत वाटत राहिल्यास नैराश्याची भावना प्रबळ होऊ शकते. आपण चांगली आई नाही असे वाटू शकते. काही मातांना या जबाबदारीतून मुक्त व्हावे असेही वाटते. यामध्ये त्यांना स्वतःला किंवा बालकाला दुखापत करण्याचेही विचार मनात येतात. असे वाटत असेल तर तुम्ही संवाद साधा. मन मोकळे करा. तुमच्या डॉक्टरांशी या विषयांसंदर्भात बोला. Postpartum Support International मध्ये तुम्हाला याबाबत साहाय्यता मिळू शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 16:22 IST
Next Story
Health special: वृद्धत्व व त्वचारोग