“यूएसच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक टाळण्यासाठी इंजेक्टेबल वजन कमी करण्याच्या सेमॅग्लुटाइड (वेगोव्ही) [Semaglutide (Wegovy)] या औषधाला मंजुरी दिली आहे. याचा अर्थ असा की, औषध अधिकाऱ्यांनी हृदयविकारावरील प्राथमिक प्रतिबंधात्मक थेरपी म्हणून वेगोव्हीचा वापर मधुमेह नसलेल्या रुग्णांसाठी वाढविला आहे, ज्यांचे वजन जास्त असू शकते”, असे डॉ. रंजन शेट्टी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले आहे. डॉ. शेट्टी हे बंगळुरूच्या मणिपाल हॉस्पिटल इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख आणि सल्लागार आहेत.

सेमॅग्लुटाइड आणि हृदयाच्या आरोग्यामधील संबंध स्पष्ट करताना डॉ. शेट्टी सांगतात की, मंजुरी मिळाल्यानंतर झालेल्या चाचण्यांमध्ये असे सिद्ध झाले की, “सेमॅग्लुटाइड या औषधाच्या वापराने खरोखरच लठ्ठ रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरते आहे. या औषधामुळे त्यांना हृदयरोग आणि हृदयविकाराचा मृत्यू होण्याची शक्यता २० टक्क्यांनी कमी झाली आहे. याशिवाय असेही समोर आले की, ” प्लेसबो (placebo) औषध घेतलेल्या लोकांच्या तुलनेत सेमॅग्लुटाइड घेतलेल्या एखाद्या व्यक्तीचा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मृत्यूचा धोका १६ टक्क्यांनी आणि कोणत्याही कारणाने मृत्यू १९ टक्क्यांनी कमी केला आहे.”

चाचणी आणि मान्यता महत्त्वाची का आहे?

वैद्यकीयदृष्ट्या सांगायचे झाले तर लठ्ठपणा हा हृदयविकाराचा एक प्रमुख धोकादायक घटक आहे आणि गोळचे सेवन करून वजन कमी करणे शक्य नाही हे मान्य आहे, तरी वजन कमी करण्याच्या ध्येयाच्या जवळ जाण्यास मदत होते. सुरुवातीला वजन कमी होण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण एकदा वजन कमी होण्यास सुरुवात झाली की, कॅलरी नसलेला आहार आणि व्यायाम करून नियमितपणे निरोगी जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक असते. तसेच वजन कमी करण्याची पूर्वीची औषधे हृदयाच्या आरोग्यासाठी संबंधित फायदे दर्शवत नाहीत आणि Wegovy हे सांख्यिकीय रीतीने कार्य करत असल्याने, ते केवळ कॉस्मेटिक वंडर ड्रग (cosmetic wonder drug) म्हणून नव्हे, तर मेनलाइन अँटी-ओबेसिटी थेरपी म्हणून वापरले जाऊ शकते”, असे डॉ. शेट्टी यांनी स्पष्ट केले.

डॉ. शेट्टी सांगतात, माझा विश्वास आहे की, “लठ्ठपणाशी संबंधित हृदय विकार असेल तर मृत्यूचा धोका जास्त असतो आणि हा धोका कमी करणारी कोणतीही थेरेपी वरदान ठरू शकते.”

हेही वाचा – कलिंगड, पुदिना, लिंबूचे शक्तिशाली डिटॉक्स ड्रिंक तुमची त्वचा उजळण्यास कशी मदत करते? तज्ज्ञांनी केला खुलासा

सेमॅग्लुटाइड खरंच हृदयाच्या आरोग्याचे संरक्षण कसे करू शकते?


चाचणीमध्ये, “सेमॅग्लुटाइड एकूण कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल किंवा रक्तदाब हे घटक प्रभावित करत नाही, परंतु सरासरी रुग्णांचे वजन सुमारे १० टक्क्यांनी कमी झाल्यामुळे हे धोके कमी झाले. औषध आणि हृदयाच्या आरोग्याच्या थेट संबंधांसाठी अधिक संशोधन आवश्यक आहे, असे डॉ. शेट्टी यांचे मत आहे.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “ग्लुकागॉनसारख्या पेप्टाइड १ (GLP-1) रिसेप्टर ऍगोनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औषधांच्या वर्गामध्ये सेमॅग्लुटाइडचा समावेश होतो. या औषधाचे सेवन केल्यानंतर आतड्यांद्वारे सोडल्या जाणाऱ्या इंक्रेटिन हार्मोन GLP-1 सारखे कार्य करते. हे इन्सुलिनचे उत्पादन उत्तेजित करते. ग्लुकागॉनचे उत्पादन कमी करते आणि पचनक्रिया मंदावते. ही सर्व कार्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतात, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी प्रणालीवरील ताण कमी होतो. पोट भरल्याची भावना वाढून तुमची भूक कमी करते आणि तुमचे जास्त खाणे कमी करते, जे कॅलरी आणि वजनावर परिणाम करते.”

“वजन कमी करणे आणि वजन नियंत्रणास गती देऊन, सेमॅग्लुटाइड हृदयासंबंधित आजारांचा धोका जसे की रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि जळजळ नियंत्रित करते. जळजळ ही हृदयातील रक्तवाहिन्या संकुचित करू शकते, ज्यामुळे प्लेक जमा होऊ शकते आणि रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवू शकते आणि रक्ताच्या गुठळ्या तयार करू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो”, असेही डॉ. शेट्टी यांनी सांगितले.

हेही वाचा – उन्हाळ्यात दररोज कैरी खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? वाचा, डॉक्टर काय सांगतात

आपण काय लक्षात ठेवावे?

डॉ. शेट्टी यांनी सांगितले की, “काही क्लिनिकल चाचण्या चालू असल्यामुळे भारतीयांसाठी इंजेक्शन म्हणून सेमॅग्लुटाइड व्यापकपणे उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ लागेल. पण, येत्या काही वर्षात ते देशात उपलब्ध होतील अशी आमची अपेक्षा आहे. याक्षणी तुम्हाला ही इंजेक्टेबल्स एका फार्मसीमध्ये मिळू शकतात, जे आयात केलेल्या ब्रँडचे असून अविश्वसनीय किमतीने विक्री केले जात आहेत किंवा परदेशात प्रवास करून ते आणणाऱ्या लोकांकडून ते मागवून घेऊ शकता. आमच्याकडे लिराग्लूटाइड (Liraglutide) हे औषध आहे, ज्याचा हृदय आणि मूत्रपिंडाच्या सुरक्षेच्या परिणामांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. क्लिनिकल चाचण्यांदरम्यान रूग्णांमध्ये, ते टाइप २ मधुमेह मेल्तिस (Type 2 diabetes mellitus) असलेल्या रूग्णांवर उपचारांचा एक प्रभावी पर्याय ठरते. परंतु, तुमच्याकडे जरी या औषधांचा वापर करण्यासाठी विशेषाधिकार असेल, तरीही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि प्रिस्क्रिप्शनवर हे औषध घ्यावे. तुमच्या आरोग्याच्या स्थितीचे वैद्यकीय विश्लेषण केल्याशिवाय, फक्त इतर लोक हे औषध घेत आहे म्हणून तुम्ही ते वापरू नका.”

याशिवाय, सेमॅग्लुटाइटमुळे तोपर्यंत वजन कमी होते, जोपर्यंत तुम्ही औषध घेत आहात. वजन कमी करणे हा एक दृष्टिकोन आहे आणि केवळ चमत्कारिक औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा तुम्ही वजन कमी करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले पाहिजे”, असेही डॉ. शेट्टी यांनी सुचवले.