Monsoon Eye Care Tips: काहींना पावसाळा ॠतू आवडतो, तर काहींना नाही. वातावरणामधील बदलामुळे पावसाळ्यासोबत विषाणूजन्‍य व जीवाणूजन्‍य आजार देखील येतात. पण तुम्‍हाला माहित आहे का या ऋतूदरम्‍यान ‘डोळ्यांना’ देखील संसर्ग होतात? प्रत्‍येकाने आरोग्‍याबाबत कोणतीही चिंता न करता पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्‍यासाठी विशिष्‍ट काळजी घेणे गरजेचे आहे. सुरक्षित राहण्‍यासाठी तोंड, नाक व हाताचे संरक्षण करण्‍याबाबत पुरेशा प्रमाणात जागरूकता निर्माण केली जात असताना अनेकांना त्‍यांच्‍या डोळ्यांचे संरक्षण करण्‍याबाबत माहित नसू शकते. यासाठीच पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेण गरजेचं आहे. पावसाळ्यात काळजी घेण्याच्या काही टिप्स येथे देत आहोत. या टिप्स डॉ. स्नेहा मधुर कंकरिया, सल्लागार नेत्रविकारतज्ज्ञ, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल, मुंबई यांनी दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महत्त्वपूर्ण व सुलभ खबरदारीचे उपाय:

  • स्वच्छता राखा: पावसाळ्यात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे हात पुसायचे टॉवेल, नॅपकीन, रुमाल स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
  • तुमचे टॉवेल, डोळ्यांच्या मेकअपचे सामान यांसारख्या वैयक्तिक वस्तू शेअर करू नका.
  • डोळ्यांना स्पर्श करू नका/ चोळू नका, कारण हातावर हजारो जीवाणू असू शकतात, जे तुमच्या डोळ्याला संसर्ग करू शकतात.
  • पाणी साचलेल्या जागा टाळा: कारण त्या ठिकाणी विषाणू, जीवाणू आणि बुरशी असू शकते.
  • कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे टाळावे कारण संसर्गाची जोखीम वाढलेली असते. त्या ऐवजी या कालावधीत चष्मा वापरावा.

(हे ही वाचा: Egg Yolk : अंड्यातील पिवळ बलक ‘या’ आजाराच्या रुग्णांनी खाऊ नये; जाणून घ्या अधिक तपशील)

कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे), रांजणवाडी, कॉर्निअल अल्सर हे सामान्यणे आढळणारे संसर्ग आहेत. डोळे लाल झाले, चिकट द्रव बाहेर येथ असेल, डोळ्यातून पाणी येत असेल, वेदना होत असतील, दृष्टी धुसर झाली असेल तर तातडीने नेत्रविकारतज्ज्ञांची भेट घ्यावी. ओव्हर द काउंटर म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेण टाळावे.

(हे ही वाचा: Weight Loss: वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे सोयाबीन; जाणून घ्या सोया चंक्स बिर्याणीची रेसिपी)

पावसात डोळ्यांचे ‘असे’ करा संरक्षण 

  • तुमच्या कॉन्टॅक्ट लेन्सची काळजी घ्या: कॉन्टॅक्ट लेन्स हाताळताना नेहमी हात धुवावेत. कॉन्टॅक्ट लेन्सेस तसेच क्लीनिंग सोल्यूशनच्या मुदतसमाप्तीच्या तारखेवर लक्ष ठेवावे.
  • तुमच्या डोळ्यावर पाण्याचे हबके मारणे टाळावे, कारण त्यात डोळे चुरचुरवणारे घटक असू शकतात.
  • डोळ्यांचा संसर्ग झाल्यास हात पुसायचे टॉवेल वा नॅपकीन शेअर करू नयेत. डोळ्याला संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करू नये कारण त्यामुळे दुसऱ्या डोळ्याला आणि दुसऱ्या व्यक्तींनाही संसर्ग होऊ शकतो.
  • पावसाळ्यात जंक फूड खाण्याची इच्छा होत असली तरी सकस आहार घ्यावा. कारण रस्त्यावरचे पदार्थ अपायकारक असू शकतात.
  • डोळ्यांचा मेकअप टाळा कारण पावसाळ्यात संसर्गांसाठी तो उत्प्रेरक ठरू शकतो.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Take care of your eyes in the rainy season learn simple solutions from expert ttg
First published on: 29-06-2022 at 13:57 IST