Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने होणारी टीका. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो, शिवाजी महाराजांचा राजकोटचा कोसळलेला पुतळा असो, बदलापूरचं प्रकरण असो देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधक लगेच तुटून पडतात. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एका वाहिनीला मुलाखत दिली त्यातही सगळे त्यांचा अभिमन्यू करु पाहात आहेत पण मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदायचा कसा ते ठाऊक आहे आणि बाहेर कसं यायचं ते पण माहीत आहे असं फडणवीस यांनी म्हटलं होतं.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही चर्चेत असतात
देवेंद्र फडणवीस जसे चर्चेत असतात त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही ( Amruta Fadnavis ) चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांनी नुकतीच सन मराठी या वृत्त वाहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस हे रोमँटिक नाहीत असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होते आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अमृता फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एका प्रश्नावर उत्तर देताना अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी हे उत्तर दिलं आहे. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्यांमुळेही कायमच चर्चेचा विषय ठरतात. आता अमृता फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य चांगलंच गाजतं आहे. या आधी अमृता फडणवीस यांनी एका शोमध्ये देवेंद्र फडणवीस एका वेळी ३५ पुरणपोळ्या खायचे असं म्हटलं होतं. महाराष्ट्रभरात त्यांच्या वक्तव्याची चर्चा झाली होती. आता अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत असं म्हटलं आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
“धरण उशाला कोरड घशाला असं म्हटलं जातं तेव्हा देवेंद्र फडणवीस माझ्यासमोर येतात, जातात. दिसतात रोज पण त्यांचा हात धरुन मजा मस्ती करताच येत नाही. धरण उशाला असतं आणि कोरड घशाला.” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यावर सोनाली कुलकर्णीने प्रश्न विचारला की देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? त्यावर अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) चटकन म्हणाल्या, “नाही देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहेत, त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना फक्त राजकारण कळतं.” अमृता फडणवीस यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशाच एका कार्यक्रमात अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी त्यांचं होणारं जे ट्रोलिंग आहे त्यावरही भाष्य केलं होतं तसंच त्यांना मामी का म्हटलं जातं? हे पण सांगितलं होतं. त्या वक्तव्याचीही चर्चा झाली होती.
ट्रोलिंगकडे कसं पाहतात अमृता फडणवीस?
ट्रोलिंगकडे कसं पाहता? असं विचारलं असता अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) म्हणाल्या, माझा ठाम विश्वास आहे की लोक मला ट्रोल करत नाहीत. कारण मी जितके आयडी पाहिले त्यात जाऊन पाहिलं तर ते राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा यांचे पेड ट्रोलर्स असतात हे माझ्या लक्षात आलेलं आहे असं उत्तर त्यांनी दिलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांना मा. मु. असं म्हटलं जायचं माजी मुख्यमंत्री त्यामुळे मला मामी म्हणायचे. मला त्याने काही फरक पडत नाही उलट मला गंमत वाटते आणि वाटून जातं की हे सगळं करायला लोकांकडे किती वेळ असतो. असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं होतं. आता त्यांचं नवं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd