शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेंना कोर्टाचा दिलासा; अजामिनपात्र वॉरंट रद्द, जाणून घ्या प्रकरण

संभाजी भिडे आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह संशयित ९० आरोपी सुनावणीसाठी सांगली न्यायालयात हजर होते.

Shivpratishtan, Sambhaji Bhide, Maharashtra, Central Government
(संग्रहित छायाचित्र)

जोधा अकबर चित्रपटावरून सांगलीमध्ये २००८ साली दंगल झाली होती. या दंगलीप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे सहित तीन जणांना तिघांचा अजामिनपात्र वॉरंट कोर्टाने रद्द केला आहे. या प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे आणि माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह संशयित ९० आरोपी सुनावणीसाठी सांगली न्यायालयात हजर होते. या दंगलप्रकरणी एकूण ९४ जणांवर गुन्हा दाखल आहे.

जोधा अकबर चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध आणि त्यांनतर पोलिसांनी आंदोलकांना अटक केल्यामुळे सांगलीत तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्यावेळी सांगलीत संचारबंदी पण लागू केली होती. एस टी बसेस आणि सार्वजनिक मालमत्तेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यानंतर यामध्ये ९४ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यासह तीन जणांविरोधातील अजामिनपात्र वॉरंट आज कोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. 

या दंगलीतील अनेक आरोपी कोर्टात सुनावणीसाठी हजर राहत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट काढण्यात आलं होतं. यामध्ये संभाजी भिडे यांच्यासह इतरांच्या नावांचा समावेश होता. त्यांच्या विरोधातील अजामीनपत्र वॉरंट रद्द करण्यात आलंय. तसेच काहींना दंड करण्यात आला आहे. तसेच इतर काहींना कोर्टाने समज देऊन प्रत्येक महिन्याला सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bail granted to three persons including shiv pratishthan sambhaji bhide hrc

Next Story
नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; राणे कुटुंबाकडून आली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “जर आजच्या आज हजर राहायला…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी