पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांनी दिलं नवं नाव; ‘तो’ उल्लेख ऐकून सभागृहात पिकला हशा

जीएसटी संदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर छगन भुजबळ यांना दिलं.

पावसाळी अधिवेशन : महाविकास आघाडी सरकारला फडणवीसांनी दिलं नवं नाव; ‘तो’ उल्लेख ऐकून सभागृहात पिकला हशा
जीएसटीच्या मुद्द्यावरुन बोलताना केलं भाष्य

विधासनभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाजादरम्यान जीएसटीसंदर्भातलं विधेयक चर्चेसाठी मांडण्यात आलं. या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी तुफान फटकेबाजी करत शिंदे सरकारला धारेवर धरलं. मात्र त्यानंतर भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसं उत्तर छगन भुजबळ यांना दिलं. विशेष म्हणजे जीएसटीच्या दरांमध्ये वाढ करण्यासंदर्भातील समितीबद्दल बोलताना फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारसाठी देवेंद्र फडणवीस यांनी अगदीच वेगळी उपमा आपल्या भाषणात दिली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सत्तेत असलेल्या सरकारचा केलेला उल्लेख ऐकून सत्ताधारी पक्षातील सर्वच सदस्य हसू लागले.

नक्की वाचा >> गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News; शिवसेनेच्या प्रश्नानंतर शिंदे सरकारची मुंबई-गोवा हायवेसंदर्भात महत्त्वाची घोषणा

भुजबळ काय म्हणाले?
भुजबळ यांनी अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावण्यावरून केंद्र सरकारच्या धोरणांवर तीव्र आक्षेप घेतला. “आपण सगळ्यांनी सांगितलं की जीएसटीचं संकलन वाढलं आहे. आत्तापर्यंत अन्नधान्यासहित अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. पण नव्या निर्णयामुळे पॅकिंग अन्नदान्य, पीठ, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ अशा अनेक जीवनावश्यक गोष्टींवर ५ टक्के जीएसटी लागू होत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने जेव्हा एखादा कर वाढवता, तेव्हा त्याचा फटका शेवटच्या माणसाला बसतो”, असं छगन भुजबळ म्हणाले.

नक्की वाचा >> सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीसांच्या भेटीचं कारण काय? कंबोज म्हणाले, “अरे भावा, आज…”

फडणवीसांना टोला…
यावेळी छगन भुजबळांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील चिमटा काढला. “तुम्ही तिकडे जे मंजूर झालंय, ते इथे मंजूर करून घेत आहात. पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईबाबतची ही भावना तिकडे त्यांना तुम्ही सांगा. सगळ्या ठिकाणी भाववाढ सुरू आहे. शाळेतल्या पेन्सिल, खोडरबरवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयाच्या ५ हजारांवरच्या बिलावर जीएसटी लावला आहे. आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला आहे. मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जीएसटीसंदर्भातलं महाराष्ट्राचं हे म्हणणं दिल्लीत सांगितलं पाहिजे”, असं भुजबळ यावेळी म्हणाले.

नक्की पाहा >> Viral Video: आदित्य ठाकरेंच्या भाषणादरम्यान BJP कार्यालयातून भाजपा कार्यकर्ते काढत होते फोटो; ही गोष्ट लक्षात येताच…

फडणवीसांचा महाविकास आघाडी सरकारला टोला
भुजबळ यांच्या या टोलेबाजीनंतर त्यांनी घेतलेल्या आक्षेपाला फडणवीसांनी उत्तर दिलं. जीएसटीच्या दरवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी एक फिटमेंट कमिटी तयार करण्यात आलेली असं सांगताना फडणवीस यांनी या कमिटीमध्ये कोणकोणती राज्यं होती हे वाचून दाखवलं. “राजस्थान म्हणजे काँग्रेसचं राज्य. पश्चिम बंगाल म्हणजे ममता बॅनर्जींचं राज्य. तमिळनाडू म्हणजे डीएमकेचं राज्य. बिहार म्हणजे नितीश कुमारांचं राज्य. उत्तर प्रदेश म्हणजे भाजपाचं राज्य. कर्नाटक भाजपाचं राज्य,” अशी यादी फडणवीस यांनी वाचून दाखवली.

नक्की वाचा >> CM शिंदेंना पाहताच विरोधकांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”

मात्र या यादीमधील शेवटचं महाराष्ट्राचं नाव घेताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला. “महाराष्ट्र म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृ्त्वामधील अजितदादांचं राज्य,” असं फडणवीस म्हणाले आणि सभागृहामध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर फडणवीसही बोलताना थांबले आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य दिसून आलं. “या फिटमेंट कमिटीने हा निर्णय घेतला. जीएसटी दरवाढीसंदर्भात काही गैरसमज आहेत. जसं पहिल्यांदा अन्नपदार्थांवर जीएसटी लावण्यात आला आहे, हा गैरसमज आहे. व्हॅट पद्धतीमध्येही होतं. तेव्हा राज्यांना अधिकार होता,” असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis calls maha vikas aghadi government as state run by ajit pawar under leadership of uddhav thackeray scsg

Next Story
मोठी बातमी! रायगडच्या श्रीवर्धनमध्ये आढळली संशयित बोट; बोटीत सापडल्या तीन एके-४७ आणि कागदपत्रं!
फोटो गॅलरी