सातारा : साताऱ्यामध्ये सध्या जीबीएसचे चार संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. हे चारही रुग्ण १५ वर्षांच्या आतील मुले आहेत. राज्यामध्ये जीबीएस म्हणजेच (गुलियन बॅरी सिंड्रोमच्या) रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. पुण्यात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यासह सांगली, नागपूर अशा अन्य जिल्ह्यांमध्येही ‘जीबीएस’चे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर संशयीतांची तपासणी सुरू केल्यावर सातारा जिल्ह्यामध्ये या आजाराचे चार संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकूण चार रुग्णांपैकी दोन रुग्णांवर साताऱ्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एक रुग्ण खासगी रुग्णालयात, एक रुग्ण कराडच्या कृष्णा रुग्णालयात असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रयोग शाळेतील वैद्यकीय तपासणीनंतर जीबीएसचे निदान स्पष्ट होईल. दूषित पाणी आणि अन्न यांमुळे हा आजार होतो. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four gbs suspects found in satara news amy