सांगली : रविवारी नांद्रे येथील धार्मिक मिरवणुकीसाठी आणलेला शेडबाळ मठाचा हत्ती वनविभागाने ताब्यात घेऊन माहुतावर वन गुन्हा दाखल केला आहे. रविवारी ताब्यात घेतलेल्या हत्तीची सोमवारी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो अद्याप कुपवाडमधील वनविभागाच्या ताब्यातच ठेवण्यात आला आहे. कर्नाटकातील शेडबाळ (ता.अथणी) येथील मठाचा हत्ती रविवारी नांद्रे (ता. मिरज) येथे आणण्यात आला होता. मिरवणुकीनंतर तो परत शेडबाळकडे ट्रकमधून नेत असताना प्राणीमित्रांनी कायदेशीर बाबींची पडताळणी करण्याची विनंती वन विभागाला केली.

हेही वाचा : भाजपा अन् काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जुंपली; पटोले म्हणाले, “नाचता येईना अंगण वाकडं” तर चव्हाण म्हणतात, “नानांनी भरपूर…”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sangli shedbal math elephant taken into custody by kupwad forest department css
First published on: 22-04-2024 at 18:32 IST