Patra Chawl Case: संजय राऊतांना जामीन नाकारल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, "काहीतरी कुठंतरी..." | Supriya Sule on sanjay raut denied bail in patra chawl case scsg 91 | Loksatta

Patra Chawl Case: संजय राऊतांना जामीन नाकारल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “काहीतरी कुठंतरी…”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पार्टीचाही उल्लेख केला.

Patra Chawl Case: संजय राऊतांना जामीन नाकारल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “काहीतरी कुठंतरी…”
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केलं भाष्य

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या अटकेच्या प्रकरणात जामीन नाकारण्यात आला आहे. संजय राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. याचसंदर्भात पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी केंद्रीय संस्थांच्या कारवाया या सरकारविरोधात बोलणाऱ्यांविरोधात वाढल्याचं दिसत आहे, असं नमूद केलं आहे. तसेच त्यांनी भारतीय जनता पार्टीला लक्ष्य करताना लॉण्ड्री असा उल्लेख केला आहे.

संजय राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र जामीन झालेला आहे. माजी गृहमंत्री अमित देशमुखांना जामीन नाही. नवाब मलिकांना जामीन नाही. काय नेमकं राजकारण वाटतंय तुम्हाला यामागे? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया यांनी, “काहीतरी कुठंतरी शिजतंय. दोन आठवड्यांपूर्वी वर्तमानपत्रात माहिती अधिकार कार्याअंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आधारित सविस्तर बातमी आली होती. त्यात म्हटलं होतं की या देशामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त, जवळपास ९५ टक्क्यांपर्यंत असेल. ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाची प्रकरणं आहेत ती विरोधकांची आहेत. असं वर्तमानपत्रात आलं असून असा सरकारचा डेटा आहे,” असा संदर्भ दिला.

“छापेमारीमध्ये वाढ झाली आहे. लोकांना अटक करण्यात वाढ झाली आहे. जी वाढ झाली आहे ती विरोधात बोलतात त्यांच्या किंवा विरोध पक्षांमध्येच झालेली आहे,” असंही सुप्रिया यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी भाजपावरही टीका केली. “अनेक असे भाजपा लॉण्ड्रीचे खासदार, पदाधिकारी, वरिष्ठ नेते आहेत. ज्यांना मी तुमच्याच चॅनेलवर बोलताना पाहिलं आहे की आम्हाला शांत झोप येते कारण आम्ही भारतीय जनता लॉण्ड्रीमध्ये आहोत. ना आमच्याकडे सकाळी सातला ईडीची रेड येते ना सीबीआयची. हे आम्ही नाही म्हणत आहोत तेच म्हणत आहेत,” असं सुप्रिया यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरामध्ये नमूद केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, पण वज्रदंतीचे ब्रँड…”; ऊस खातानाच्या फोटोवरून भाजपा आमदाराचा टोला

संबंधित बातम्या

“…त्याचा मी पुरावा आणला आहे”, म्हणत आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ‘ते’ पत्रच वाचून दाखवलं!
“देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या ‘त्या’ बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती होती का?” आदित्य ठाकरेंचा सवाल, उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
“बालेकिल्ले हलत असतात, यापुढेही हलतील” कोकण दौऱ्याआधी राज ठाकरेंचं विधान
आरे कारशेड प्रकरण; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाशी युती करणार? राज ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Video: ‘बिग बॉस’च्या घरात जेवणावरुन वाद, अर्चनाने शिवच्या भरलेल्या ताटामधून चपाती उचलली अन्…; व्हिडीओ व्हायरल
नीना गुप्तांचा वर्कआउट बघून व्हाल थक्क; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “ही तर सुरवात…”
बहुचर्चित ‘अवतार २’ केरळमध्ये होणार नाही रिलीज; चित्रपटगृहाच्या मालकांचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण
पिंपरी-चिंचवडमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात वाढले
विश्लेषण : यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला इजिप्तच्या अध्यक्षांना निमंत्रण; प्रमुख पाहुण्यांची निवड नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या