एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनात शिवसेनेचे आणखी ३ आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. पोलिसांच्या बंदोबस्तात या ३ आमदारांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. मात्र, हे तीन आमदार नेमके कोण आहेत हे अद्याप कळू शकलेलं नाही. एकनाथ शिंदेंना समर्थन देणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपाच्या ताब्यात; संजय राऊतांचा गंभीर आरोप

राज्यातील राजकीय वातावरण तापले

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नाराज असलेले एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांसह आधी सुरत तर आता गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंडामागची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आम्ही अद्याप शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड सत्तेसाठी आम्ही करणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी टिव्ही ९ सोबत बोलताना म्हटले होते.

हेही वाचा- एकीकडे ‘मातोश्री’ला भेट, तर दुसरीकडे शिंदेंना फोन; ठाणे जिल्ह्यातील शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांची धावाधाव

शिवसेनेचे ४० आमदार सोबत असल्याचा दावा

माझ्यासोबत सध्या शिवसेनेचे ४० आमदार असून आणखी १० आमदार येणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. शिवसेनेचे आणखी ३ आमदार एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ गुवाहीटमध्ये दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची संख्या वाढून ४३ वर गेली आहे. ५५ आमदार संख्या असलेल्या शिवसेनेचे खरच ४३ आमदार एकनाथ शिंदेसोबत असतील तर शिवसेनेसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three more shiv sena members reached guwahati in support of eknath shinde dpj
First published on: 23-06-2022 at 09:29 IST