चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहताच्या आगामी ‘शाहीद’ चित्रपटाचे बॉलीवूड अभिनेता आमिर खान प्रमोशन करणार आहे. त्यामुळे, हंसल मेहता सध्या फार खूश आहे. आमिरचा चित्रपटाशी कोणताही संबंध नसताना त्याने स्वतः या चित्रपटाचे प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला आहे.
वकिल आणि मानवी हक्कांचे कार्यकर्ते शाहीद आझमी यांच्यावर आधारित असलेल्या ‘शाहीद’ चित्रपटाचा आमिरने ट्रेलर पाहिला. इतकेच नाही तर आमिरने त्याच्या फेसबुक पेजवर हा ट्रेलर पोस्टदेखील केला आहे. यापूर्वी करण जोहरने ‘द लंचबॉक्स’ तर किरण रावने ‘शिप ऑफ थिसस’च्या प्रमोशनमध्ये सहभाग घेतला होता. हे दोन्ही चित्रपट तिकीट बारीवर चालले असून करण जोहर आणि किरण रावच्या सहभागाचा त्यांना चांगलाच फायदा झाला होता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-10-2013 at 05:01 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan all set to promote shahid