मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील ग्राहक मंचाने महानायक अमिताभ बच्चन आणि नवरत्न तेल उत्पादक कंपनी इमामीच्या दिशाभूल जाहिरातीविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये लक्ष घातले आहे. नवरत्न ठंडा-ठंडा, कुल-कुल कसा असू शकतो ? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिती, वाणीकडून जाणून घ्या डिझायनर लेहंग्याच्या स्टाइल टिप्स

जबलपूर येथे राहणाऱ्या पीडी बाखले या ग्राहकाने ग्राहक मंचाकडे दिशाभूल जाहिरात करणाऱ्या या तेलाबाबत तक्रार केली आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष सुनील कुमार श्रीवास्तव यांनी अमिताभ आणि इमामी कंपनीला समन्स बजावला असून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. बाखले यांचे वकील ओपी यादवने अमिताभ बच्चन यांनी केलेली जाहिरात ही ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ च्या नियमांविरोधात असल्याचे म्हटले आहे.

याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, या तेलाची जाहिरात करताना हे तेल ठंड आणि कूल असल्याचं अमिताभ म्हणतात. पण ते ठंड आणि शांत करणारं का आहे हे मात्र सांगत नाहीत. तसंच या तेलात कोणते पदार्थ किती प्रमाणात वापरण्यात आले आहेत हेही सांगितले जात नाही. या तेलाच्या उत्पादनाची अधिकृत नोंदणी झालेली नसल्यामुळे या कंपनीकडे तेलाच्या निर्मितीचा कोणताही परवाना नाही. या जाहिरातीत डोकं दुखी, अंग दुखी यापासून आराम देण्यासाठी या तेलाचा उपयोग करता येईल असे म्हटले आहे. हे एक औषधी तेल असल्याचेही या जाहिरातीत म्हटले आहे. अमिताभ बच्चन यांनी यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून ते या सर्व प्रकरणावर काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेव्हिंग क्रीमच्या जाहिरातीमुळे शाहरुखला कोर्टाची नोटीस

याआधीही शाहरुख खानला निकृष्ट दर्जाच्या शेव्हिंग क्रीमची जाहिरात केल्याप्रकरणात भोपाळच्या स्थानिक न्यायालयाने नोटीस पाठवली.  हे क्रीम मध्यप्रदेश अन्न आणि औषध विभागाकडे तपासणीसाठी पाठवले असता तपासणीत ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आलेले. त्यामुळे स्थानिक दुकानाचे मालक आणि शेव्हिंग क्रीम कंपनीच्या मालकांना नोटिस पाठवण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How is navratan tel so cool question to amitabh bachchan