‘बाहुबली’नंतर अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’ची चाहत्यांमध्ये उत्सुकता पहायला मिळते. या चित्रपटात प्रभाससह बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटात मराठ मोळे अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर देखील झळकणार आहेत. ‘साहो’मध्ये महेश मांजरेकरांची एण्ट्री चाहत्यांसाठी एक सुखद धक्काच असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘साहो’मध्ये महेश मांजरेकर अनोख्या रुपात दिसणार आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘साहो’मधील लूक प्रदर्शित केला आहे. या फोटोमध्ये महेश मांजरेकरांनी गळ्यात चांदीच्या चैनी, हातात अंगठ्या ,कानात बाळी घातली आहे. एकंदरीत त्यांचा हा लूक पाहता साहोमध्ये महेश मांजरेकर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सुजीत यांनी दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूरशिवाय नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ३० ऑगस्ट रोजी साहो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh manjrekar look from saaho avb