मलायकाच्या व्हिडीओतील ‘तो’ ठरतोय सर्वांच्या नजरेत हिरो, ‘या’ कृतीचं होतंय कौतुक

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.

मलायकाच्या व्हिडीओतील ‘तो’ ठरतोय सर्वांच्या नजरेत हिरो, ‘या’ कृतीचं होतंय कौतुक
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मलायका कॅमेराला पोज देत असल्याचे दिसत आहे

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा एका पेक्षा एक बोल्ड स्टाइल आणि फॅशनच्या आउटफिट्समध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांना किंवा स्टार पार्टीला हजेरी लावताना दिसते. मलायकाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. आताही मलायका अरोराचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मलायका बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत असून ती एका व्यक्तीसोबत कॅमेराला पोज देत आहे. व्हिडीओ मलायकाचा असला तरी या व्हिडीओमधील त्या व्यक्तीच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मलायका कॅमेराला पोज देत असल्याचे दिसत आहे आणि एक व्यक्ती मलायकासोबत उभी आहे. तो मलायकासोबत उभा राहून पोज देतो पण मलायकापासून ठराविक अंतर ठेवून उभा राहतो. तिला आपला स्पर्श होणार नाही याची काळजी घेताना तो दिसतोय. आपल्या याच कृतीमुळे सध्या तो सोशल मीडियावर सर्वांच्या नजरेत हिरो ठरताना दिसतोय. त्याच्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतंय.

आणखी वाचा- कसा आहे आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’? दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांची पहिली प्रतिक्रिया

मलायका अरोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यावर युजर्सच्या कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. अनेकांनी आपल्या कमेंटमध्ये या व्हिडीओतील व्यक्तीचं, त्याच्या सभ्यपणाचं कौतुक केलं आहे. मलायका अरोराच्या व्हिडीओची चर्चा होणं तसं नवीन नसलं तरीही यावेळी मात्र या व्यक्तीमुळे मलायका चर्चेत आहे.

आणखी वाचा- Video : ४८ वर्षीय मलायका अरोराने केलं बॉडी स्ट्रेचिंग, व्हिडीओ एकदा पाहाच

दरम्यान मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती मागच्या काही वर्षांपासून अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत असून दोघंही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. यामुळे त्यांना बऱ्याचदा ट्रोलही केलं जातं. याशिवाय वयातील फरकामुळेही या दोघांवर अनेकदा टीका होताना दिसते. लवकरच मलायका अर्जुन लग्न करणार असल्याचंही बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण: ‘स्टार’ कलाकार अपयशाची जबाबदारी घेणार का?
फोटो गॅलरी