बॉलीवूड दिग्दर्शक करण जोहरने अद्याप विवाह केलेला नाही. सलमानप्रमाणे करण केव्हा लग्न करणार असा त्याच्या चाहत्यांचा नेहमी प्रश्न असतो. तुम्हाला माहित आहे का पण करणचे पहिले प्रेम कोण होते ते? नाही ना, तर आम्ही सांगतो.. करणचे पहिले प्रेम होते ट्विंकल खन्ना.
अभिनयाकडून लेखनाकडे वळलेल्या ट्विंकल खन्नाच्या मिसेज फनीबोक्स या पुस्तकाचे नुकतेच अनावरण झाले. त्यावेळी ट्विंकलने आपण करणचे पहिले प्रेम असल्याचा खुलासा केला. ट्विंकल म्हणाली की, शाळेच्या दिवसांमध्ये मी करणला फार आवडायचे. लहानपणी माझ्या चेह-यावर मिश्यांसारखे हलकेसे केस होते आणि ते करणला आवडायचे. तो म्हणायचा, मला तुझ्या मिश्या खूप आवडतात. त्या मला फार आकर्षक वाटतात. यावेळी हजर असलेल्या करणनेही त्यास दुजोरा दिला. असो, ट्विंकलने तर लग्न केले मात्र, करण जोहर अजून काही बोहल्यावर चढलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twinkle khanna karan johar was in love with me and found my moustache hot