बॉलिवूड क्वीन कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा बराच मोठा चाहता वर्ग आहे. पण ३४ वर्षीय कंगना आजही सिंगल आहे. त्यामुळे तिच्या लग्नाबाबत चाहत्यांना बरीच उत्सुकता आहे. पण बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे जो कंगनाशी लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीलाही घटस्फोट देऊ शकतो. एका रिअलिटी शोमध्ये या अभिनेत्यानं स्वतःच याचा खुलासा केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंगनाशी लग्न करण्यासाठी आपल्या पत्नीलाही सोडायला तयार असलेली व्यक्ती दुसरं कोणी नसून प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर आहेत. कंगनाबद्दल बोलताना अनिल कपूर यांनी करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हा खुलासा केला होता. करणने अनिल कपूर यांना, ‘एका अशा महिलेचं नाव सांगा जिच्यासाठी तुम्ही पत्नी सुनिता कपूर यांना सोडू शकता.’ असा प्रश्न विचारला होता. करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना अनिल कपूर यांनी कंगना रणौतचं नाव घेतलं होतं. अर्थात त्यांनी गंमतीनं असं म्हटलं होतं. मात्र हा किस्सा नंतर बराच चर्चेत राहिला होता.

अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांचं लग्न १९८४ साली झालं होतं. त्यावेळी सुनिता या मॉडेलिंग करत होत्या. तर अनिल कपूर यांनी बॉलिवूड करिअरला नुकतीच सुरुवात केली होती. आता सुनिता कॉस्ट्यूम डिझायनर आहेत. अनिल आणि सुनिता यांना सोनम, रिया आणि हर्षवर्धन ही तीन मुलं आहेत. सोनम आणि हर्षवर्धन अभिनय क्षेत्रात आपलं करिअर करत आहेत तर रिया कपूर निर्माती आहे.  

दरम्यान कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात वेगवेगळ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तिच्याकडे ‘तेजस’, ‘धाकड’ या चित्रपटांसह इतरही काही प्रोजेक्ट्स आहेत. काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या तिच्या ‘थलायवी’ या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When anil kapoor open up i would leave my wife to get married with kangana ranaut mrj