मुंबई : दहिसर पश्चिम येथे डोक्यात विटा पडून ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी इमारतीच्या नूतनीकरणाचे काम घेतलेल्या कंपनीच्या मुकादमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्वाहनातून विटा घेऊन जात असताना त्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात पडल्या. पुढे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

दहिसर येथे वास्तव्यास असलेले शरद आंब्रे (६५) याच परिसरातील एका इमारतीत सुरक्षा रक्षक म्हणून गेली पाच वर्षे काम करीत होते. तेथील नोकरी सुटल्यानंतर आंब्रे डायमंड इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस येथे गेल्या १५ दिवसांपासून काम करीत होते. आंब्रे यांनी मुलाला नोकली लावण्यासाठी सोमवारी इमारतीजवळ बोलावले होते. मुलगा तेथे पोहोचला असता त्याला डायमंड इंडस्ट्रीलय इस्टेट प्रिमायसेस कॉ. हाऊसिंग सोसायटी येथे गर्दी दिसली. जवळ जाऊन पाहिले असता त्याला शरद आंब्रे बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या कान आणि नाकातून रक्त येत होते. नूतनीकरणासाठी उद्वाहनातून विटा घेऊन जात असताना त्या आंब्रे यांच्या डोक्यात पडल्या. त्यामुळे ते जखमी झाले. त्यानंतर मुलाने तत्काळ एस. व्ही. रोड येथील समर्पण रुग्णालयात वडिलांना उपचारासाठी दाखल केले.

हेही वाचा – विधानसभा अध्यक्षांसह शरद पवार गटाच्या १० आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस

हेही वाचा – वसई-विरारमधील २९ गावांचा वाद : गावे समाविष्ट करण्याच्या नव्या निर्णयाला नव्याने आव्हान द्या, विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाची सूचना

सायंकाळी उपचारादरम्यान शरद आंब्रे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या तक्रारीवरून नूतनीकरणाचे काम करणारा कंपनीचा मुकादम नसीम शेख यांच्याविरोधात दहिसर पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A 65 year old security guard died after bricks fell on his head a case was registered in dahisar police station mumbai print news ssb
First published on: 21-02-2024 at 14:35 IST