मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या पित्याला गुन्हे शाखेच्या कक्ष – ३ च्या पोलिसांनी पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी ताडदेव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण मुंबईत वास्तव्यास असलेली १७ वर्षांची मुलगी अचानक घरातून निघून गेली. त्यामुळे वडिलांनी सकाळी ८.३० च्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ताडदेव पोलिसांत दिली. दरम्यान, गुन्हे शाखा कक्ष -३ च्या पोलीस पथकाने मुलीचा शोध सुरू केला. दुपारी २ च्या सुमारास मुलगी महालक्ष्मी रेल्वे स्थानकात असल्याचे समजताच पथकाने स्थानक गाठून मुलीला ताब्यात घेतले. कार्यालयात आणून तिची चौकशी करण्यात आली. त्यावेळी तिने घर सोडून पळून गेल्याचे सांगितले. आईची मानसिक स्थिती ठिक नाही. तर वडील गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक शोषण करतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून घर सोडले, असे मुलीने सांगताच पोलिसांनी मुलीच्या बापाला पकडून ताडदेव पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा – आनंद दिघे यांच्या नावाने स्थापन मंडळाला रिक्षा चालक-मालक संघटनांचा विरोध

हेही वाचा – मुंबई : मध्य वैतरणा आणि मोडक सागर धरणांदरम्यान बंधारा बांधणार, धरणातील विसर्गातून वाया जाणारे पाणी वाचवणार

वडिलांच्या लैगिंक अत्याचाराला वैतागून मी मित्राकडे ठाण्याला गेली. पण त्याने सोबत रहायला नकार दिला. त्यामुळे पुन्हा महालक्ष्मीला आले, असे मुलीने सांगितले. दरम्यान, वडील असे काही करतील याच्यावर लोकांना विश्वास बसणार नाही. म्हणून तिने वडील लैंगिक शोषण करतानाचा व्हिडीओ त्यांच्या मोबाइलमध्ये गुपचूप चित्रित केला. त्यामुळे मुलीचे आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against father who has been abusing his daughter for five years mumbai print news ssb