मुंबई : गेली सहा वर्षे बंद असलेल्या ‘इरॉस’ चित्रपटगृहाचे नेमके काय होणार? हे चित्रपटगृह जमीनदोस्त होणार का?  त्याची अंतर्गत जुनी रचना कायम राहणार का? असे कित्येक प्रश्न चित्रपटप्रेमींकडून उपस्थित करण्यात येत होते. मात्र दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू असलेल्या ‘इरॉस’ चित्रपटगृह लवकरच ‘आयमॅक्स’ चित्रपटगृहाच्या नव्या झळाळीसह उभे राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९३८ साली बांधण्यात आलेल्या या चित्रपटगृहाची मुंबईतील पहिल्या एकपडदा चित्रपटगृहांमधील एक लोकप्रिय चित्रपटगृह अशी ओळख आहे. मात्र गेली काही वर्षे ते  बंद होते. हे चित्रपटगृह जमीनदोस्त होणार अशीही भीती समाजमाध्यमांवरून व्यक्त केली जात होती. आयनॉक्स समूहाकडून इरॉस चित्रपटगृह बहुपडदा चित्रपटगृह म्हणून विकसित करण्यात येत होते. आता हे चित्रपटगृह आयनॉक्स-पीव्हीआर समूहाचे आयमॅक्स चित्रपटगृह म्हणून ओळखले जाईल.

लोअर परळनंतर दक्षिण मुंबईतही ..

कधीकाळी मुंबईतील महत्त्वाचे एकपडदा चित्रपटगृह म्हणून ओळखले गेलेले इरॉस आता दक्षिण मुंबईतील पहिले आयमॅक्स चित्रपटगृह ठरणार आहे. याआधी लोअर परळ येथे आयमॅक्स उपलब्ध झाले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai iconic eros cinema to restart as an imax mumbai print news zws