मुंबई : अभिनेता सलमान खान याला धमकीचा ई-मेल पाठवल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका संशयिताला राजस्थानमधून ताब्यात घेतले. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
सलमान खानच्या वतीने प्रशांत नरेंद्र गुंजाळकर (४९) यांनी वांद्रे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली होती. गेल्यावर्षी जून महिन्यात सलमान याला अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र लिहून सिद्धू मुसेवाला प्रमाणे जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोईने नवीन मुलाखतीत सलमान याला पुन्हा धमकी दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी राजस्थानमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.