A farmer died in an attack by wild elephants in Gondia | Loksatta

गोंदिया : रानटी हत्तींच्या कळपाने घेतला शेतकऱ्याचा बळी; एक जखमी

शेतात शिरलेल्या हत्तीच्या कळपाळा हकलण्याच्या प्रयत्न केल्यामुळे हत्ती चिडले आणि त्यांनी शेतकऱ्याला चिरडले.

गोंदिया : रानटी हत्तींच्या कळपाने घेतला शेतकऱ्याचा बळी; एक जखमी
रानटी हत्तींच्या कळपाने घेतला शेतकऱ्याचा बळी

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या एक आठवड्यापासून रानटी हत्तींचा कळप धुमाकूळ घालत आहे. आज, मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिडका/येरंडी येथील एका शेतकऱ्याचा हत्तींच्या कळपाने बळी घेतला, तर एक जण जखमी झाला. सुरेंद्र कळहीबाग (४२, रा. मु. तिडका /पौनी ता.अर्जुनी मोरगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

हेही वाचा- उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ९४ गावात लंम्पीचा प्रसार; ५४४ जनावरे बाधित

कळहीबाग शेतात जागली करीत असताना हत्तींचा कळप त्यांच्या शेतात शिरला. हत्तींचा कळप पिकांची नासधूस करीत असल्याचे पाहून त्यांनी हत्तींना हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात हत्तींनी चिरडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर एक शेतकरी जखमी झाला, अशी माहिती नवेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोशन दोनोडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या घटनेमुळे तालुक्यात रानटी हत्तींची दहशत पसरली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
तब्बल ९ महिन्यानंतर गुरुवारी डीपीसीच्या बैठकीचे आयोजन; उपमुख्यमंत्री व पालकमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

संबंधित बातम्या

‘हॅलो, तुमच्यावर असलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीवर चर्चा सुरू आहे…’; खंडणीसाठी धवनकर कुलगुरू कक्षातून करायचे संपर्क
माझा फोन उचलत का नाही, असे विचारत एकतर्फी प्रेमातून गुंडाचा तरुणीवर…
बदल्यांवरून राज्यातील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये खदखद, कारणे कोणती?
आयुर्वेदाच्या नावावर समाज माध्यमांवर जीवघेणे सल्ले ; बांगला पान, लसूण, कापूर खा, आजार दूर करा!
भंडारा : वृध्द दाम्पत्याने दिला आज सायंकाळी आत्मदहन करण्याचा इशारा, पत्र मिळताच तहसीलदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
NIA ची मोठी कारवाई! दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाबमध्ये २० ठिकाणी छापेमारी
पुणे कॉंग्रेसची मरगळ कधी दूर होणार ?
पुणे: ‘पीएमआरडीए’कडून वर्तुळाकार रस्त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू
“भाजपा सरकारच्या नाकाखाली त्याने सात लाख हिंदू काश्मिरी पंडितांचा…”; “काश्मीर फाइल्स अश्लील” टीकेवरुन दिग्दर्शकाचा संताप
पुणे: महात्मा फुले मंडई परिसराचा कायापालट; महामेट्रो, महापालिकेकडून आराखडा तयार